आषाढी वारी व मान्सून च्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापनचे प्रशिक्षण
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आषाढी वारी आणि येणाऱ्या मान्सून कालावधीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या सूचनेनुसार अक्कलकोट व परिसरातील पोलिस पाटील, महसूल सेवक, अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलिस विभागाचे कर्मचारी यांना रेस्क्यू बोट चालवणे, बचाव कार्य करणे तसेच पोहणे व बचाव तंत्र (technique) याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिशागर ढोले यांनी दिली.
या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात आज अक्कलकोट तालुक्यात करण्यात आली. यावेळी पोलिस पाटील, महसूल सेवक आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षण/कार्यशाळेसाठी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशिक्षक, तसेच बजरंग होतकर रेस्क्यू अकॅडमी प्रशिक्षक आणि आपदा मित्र सोलापूर हे प्रशिक्षक म्हणून सहभागी आहेत. प्रशिक्षणास सहाय्य म्हणून अरुणा राठोड आपदा सखी सोलापूर, आशा सेविका होटगी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सागर धप्पादुळे आपदा मित्र शुभांगी गवते आपदा सखी सोलापूर सहाय्यक प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शनात नियोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत पुढील टप्प्यांमध्ये अक्कलकोट तहसील व नगरपालिका, माढा तालुका व कुर्डुवाडी नगरपालिका, मोहोळ तालुका, बार्शी तालुका व बार्शी नगरपालिका, उत्तर सोलापूर तालुका, अपर मंद्रुप तहसील, करमाळा तालुका व माळशिरस तालुका या भागांतील संबंधित यंत्रणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment