अन्यथा मी सोलापूरात अन्नत्याग आंदोलन करणार: फारुक शाब्दींचा इशारा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, June 21, 2026

अन्यथा मी सोलापूरात अन्नत्याग आंदोलन करणार: फारुक शाब्दींचा इशारा

अन्यथा मी सोलापूरात अन्नत्याग आंदोलन करणार: फारुक शाब्दींचा इशारा




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरात धीम्या गतीने विकास होत आहे, त्यानिमित्त शाब्दी सोशल वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने महापौर आणि स्थायी समिती सभापतींना निवेदन देण्यात आले. सोलापुर महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता स्थापन झाली आहे. गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत भाजप सत्तेत आहे, विकास मात्र ठप्प झाला आहे. सोलापूर शहरात अनेक स्मशानभूमीना महानगरपालिकेच्या वतीने मोठा निधी दिला आहे. मुस्लिम स्मशानभूमीच्या विकासासाठी एक रुपयाही निधी दिला जात नाही. फारुक शाब्दी व त्यांच्या समर्थकांनी निवेदन दिले आहे. फारूक शाब्दी यांनी स्थानिक प्रशासनाला ठणकावून सांगितलं असून हीच मागणी घेऊन आम्ही मागच्या महिन्यात निवेदन दिले होते, मात्र आमच्या मागणीची दखल घेतली नाही. एक महिन्याच्या आत मुस्लिम स्मशानभूमी असो किंवा मुस्लिम व इतर वस्तींत विकास कामे केली नाही तर अन्नत्याग आंदोलन केले जाणार आहे. स्थानिक शासन किंवा राज्य शासनाला आंदोलनाची भाषा समजत असेल तर मी अन्नत्याग आंदोलन करणार असा इशारा फारुक शाब्दी यांनी दिला आहे.ही आंदोलन पूनम गेट येथे होणार आहे.

यावेळी निवेदन देताना राजा सर बागवान, कोमारो सय्यद, रियाज खरादि, अजहर शेख, याकुब शेख, शोएब खलिफा,बशीर शेख, महिबुब अली कुरेशी, जुबेर कुरेशी, रियाज बागवान, सुलतान शेख उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages