शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन रक्तदान व शैक्षणिक साहित्य वाटपाने साजरा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शिवसेना पक्षाच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख तथा सोमपा गटनेते अमोल बापू शिंदे यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तकांचे वाटप तसेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला शिवसैनिक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर स्व. आनंद दिघे यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर रक्तदान शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. शिबिरात तब्बल ६० रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रवीणजी तानवडे, प्रकाश काका अवस्थी, युवानेते ज्ञानेश्वर आप्पा सपाटे, संजय सरवदे,राजकुमार शिंदे, आयुब पठाण, आकाश गजघाटे, देवा विटकर, शशिकांत शिंदे, जय मस्के, अनिताताई गवळी, उमाताई माळी, प्रभाकर गायकवाड, कुमार धुमाळ, माजिद बागवान, महादेव गवळी, बाळासाहेब पवार, जावेद पटेल, गणेश कुलकर्णी, विक्रांत वानकर, महेश गायकवाड, कुणाल दीक्षित, अयान बागवान, सचिन बसगीकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमामुळे रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित झाले, तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून समाजोपयोगी कार्याचा आदर्श निर्माण करण्यात आल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
.png)
No comments:
Post a Comment