सोलापूर शहरातील नो डिजिटल झोन' चा आदेश रद्द करा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- उच्च न्यायालयाचे बेकायदेशीर डिजिटल फलक लावण्याबाबत आदेश असताना व सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने नो डिजिटल झोन च्या चौकात डिजिटल फलक लावण्यास मनाई आदेश असताना सुद्धा नो डिजिटल झोन चौकात अनेक बेकायदेशीर डिजिटल फलक लावण्यात येत आहेत त्यांच्यावर महानगरपालिकेच्या वतीने कोणतीच कारवाई करण्यात येत नाही आदेशाचे अंमलबजावणीतील त्रुटी आणि प्रशासकीय निष्क्रियतेबाबत संभाजी ब्रिगेडच्या वतीने महानगरपालिकेचे आयुक्त सचिन उंबासे यांना सोलापूर शहरातील नो डिजिटल झोन आदेश रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
शहरांमध्ये विविध नेत्याचे वाढदिवस पक्षिय राजकीय नेत्यांचे दौरे व अनेक कारणामुळे राजकीय नेते व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी महानगरपालिकेच्या नो डिजिटल झोन मध्ये बेकायदेशीर डिजिटल फलक विनापरवानगीने महानगरपालिकेच्या नाकावर टिच्चून लावत आहेत. अशा बेकायदेशीर डिजिटल लावणाऱ्या वर कोणतीच कारवाई महानगरपालिकेच्या वतीने होत नाही त्यामुळे शहरात डिजिटल लावण्याची पेव फुटले आहे त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे हे फलक लावताना कोणतीच कायदेशीर परवानगी घेतलेली जात नाही आणि महानगरपालिका अधिकारी त्यांच्यावर कोणतीच कारवाई करताना धजत नाहीत त्यामुळेसोलापूर महानगरपालिकेने शहरात नो डिजिटल झोन' मध्ये डिजिटल लावता येणार नाही असा आदेश काढला होता मात्र, आज अनेक वर्षं महिने उलटूनही या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत नाही.
त्यामुळे महापालिकेची प्रतिमा जन माणसात मलीन होत आहे
जर प्रशासनाला या नो डिजिटल झोनची अंमलबजावणी करणे शक्य नसेल, तर हा अपूर्ण आणि दिशाभूल करणारा आदेश त्वरित रद्द करण्यात यावा यापुढे कोणालाही कुठेही डिटेल फलक लावण्यास मनाई करण्यात येऊ नये नाहीतर महानगरपालिका प्रशासनाने नो डिजिटल झोन च्या आदेशाची कठोर अंमलबजावणी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे मा. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनलदास उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष विक्रम वानकर जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष संतोष सुरवसे जिल्हा सचिव लखन पारसे प्रकाश डोंगरे आदी उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment