सोलापुरात खासदार संजय दिना पाटील यांच्या निषेधार्थ पत्रकारांची निदर्शने - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 26, 2026

सोलापुरात खासदार संजय दिना पाटील यांच्या निषेधार्थ पत्रकारांची निदर्शने

 सोलापुरात खासदार संजय दिना पाटील यांच्या निषेधार्थ पत्रकारांची निदर्शने





सोलापूर (कटूसत्य वृत्त):-पत्रकारांना धमकीची भाषा वापरल्याचा आरोप करत सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सोलापुरातील पत्रकारांनी खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात निषेध आंदोलन केले. संबंधित प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
       अलीकडेच शिवसेना (ठाकरे गट) सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर अरेरावीची भाषा वापरत धमकी दिल्याचा आरोप पत्रकार संघटनांनी केला आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ पत्रकारांनी एकत्र येत सोलापुरात आंदोलन केले.
निदर्शनादरम्यान पत्रकारांनी जोरदार घोषणाबाजी करत राज्य शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि पत्रकारांना सुरक्षित वातावरणात काम करण्याची हमी द्यावी, अशी मागणी केली. स्वतंत्र आणि निर्भीड पत्रकारितेचे संरक्षण करणे ही लोकशाहीची गरज असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
           पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकार पत्रकारांबाबत संवेदनशील आहे. मात्र पत्रकारांना धमकावणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न आहे. लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने व संयमाने वागणे अपेक्षित असताना अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे चुकीचा संदेश जात असल्याची प्रतिक्रिया देत श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी या घटनेचा निषेध नोंदविला. 
           यावेळी लोकशाहीत पत्रकारांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपणे महत्त्वाचे आहे. प्रश्न विचारणे त्यांचा अधिकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ या घटनेची नोंद घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करावी.अशा प्रकारच्या घटनांमुळे पत्रकारांवर दबाव निर्माण होण्याची शक्यता असून शासनाने याबाबत स्पष्ट भूमिका घेणे आवश्यक आहे, अशी मागणी श्रमिक पत्रकार संघाचे खजिनदार किरण बनसोडे, राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके यांनी केली.
        या आंदोलनात श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे, महाराष्ट्र राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके,  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आदेप्पा , डिजिटल मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष विजयकुमार बाबर, डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे सोलापूर अध्यक्ष विकास कस्तुरे, कृष्णकांत चव्हाण, प्रीतम पंडित, अनिकेत गायकवाड, सौरभ वाघमारे, रवी ढोबळे, विनोद हुमनाबादकर, विक्रांत कालेकर, अनिल कांबळे, इरण्णा जुजगार , इरफान शेख, दीपक शिराळकर , लक्ष्मीकांत शिंदे, तौसीफ शेख, यासीन शेख यांच्यासह विविध पत्रकार संघटनेचे पत्रकार, कॅमेरामन व माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages