निवडणूक निरीक्षक श्रवण हार्डीकर यांच्याकडून स्ट्रॉंग रूमची पाहणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 18, 2026

निवडणूक निरीक्षक श्रवण हार्डीकर यांच्याकडून स्ट्रॉंग रूमची पाहणी

 निवडणूक निरीक्षक श्रवण हार्डीकर यांच्याकडून स्ट्रॉंग रूमची पाहणी



 

सोलापूर(कटूसत्य वृत्त):-  महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकार मतदारसंघ वार्षिक निवडणूक कार्यक्रम २०३६ च्या अनुषंगाने सोलापूर स्थानिक प्राधिकार मतदार संघासाठी दिनांक १८ जून २०२६ रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. या निवडणुकीसाठी सहा मतदान केंद्रावरील मतदानाची प्रक्रिया पार पाडल्यानंतर नियोजन भवन येथे तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूम मध्ये मत पेट्या ठेवण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने निवडणूक निरीक्षक श्री. श्रावण हार्डीकर यांनी स्ट्रॉंग रूमची पाहणी केली.

     यावेळी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस. कार्तीकेयन, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख आदी उपस्थित होते.

  भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे या निवडणुकीसाठी नियोजन भवन येथे मतमोजणी केंद्र निर्माण करण्यात आलेले आहे. १८ जून रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर मतपेट्या ठेवण्यासाठी याच ठिकाणी स्वतंत्र स्ट्रॉंग रूमची निर्मिती करण्यात आलेली आहे. या स्ट्रॉंग रूमची पाहणी आज निवडणूक निरीक्षक श्रवण हार्डीकर यांनी केली. तसेच पोलीस प्रशासनाला या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्याबाबत निर्देशित केले. या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सर्व व्यवस्था करण्यात याव्यात असेही त्यांनी सांगितले.

 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages