आरोग्य विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठात ’इथेच टाका तंबू’ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 18, 2026

आरोग्य विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठात ’इथेच टाका तंबू’

 आरोग्य विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठात ’इथेच टाका तंबू’

समाजात बदल घडविणारे नाटयप्रयोग गरजेचे
                         - मा. कुलगुरु प्रा. संजीव सोनवणे यांचे प्रतिपादन




नाशिक(कटूसत्य वृत्त):-  समाजात बदल घडविणारे नाटयप्रयोग गरजेचे असल्याचे प्रतिपादन मा. कुलगुरु प्रा. संजीव सोनवणे (अतिरिक्त कार्यभार) यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठात ’इथेच टाका तंबू’ या नाटकाचे विद्यापीठाच्या आवारातील धन्वंतरी सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या दोन अंकी नाटकाची निर्मिती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ललित कला केंद्र यांनी केली आहे.
   याप्रसंगी मा. कुलगुरु प्रा. संजीव सोनवणे (अतिरिक्त कार्यभार), कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, विद्यापीठाच्या मा. व्यवस्थापन परिषेदचे सदस्य डॉ. सचिन मुंबरे, डॉ. विठ्ठल धडके, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधीकारी श्री. बोधिकिरण सोनकांबळे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यापीठाचे मा. कुलगुरु प्रा. संजीव सोनवणे (अतिरिक्त कार्यभार) यांनी सांगितले की, महाराष्ट्राला सांस्कृतिक व नाटय मंडळाची परंपरा आहे. या परंपरेचे जतन व संवर्धन होण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने समाज प्रबोधन व मनोरंजन यांचा मेळ घालणारे हा नाटय प्रयोग कौतुकास्पद आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ललित केंद्राने ’इथेच टाका तंबू’ च्या माध्यमातून समाजात घडणाऱ्या घटकांवर प्रकाशझोत टाकला आहे. नाटकातील अभिनेते व कलाकारांचे काम स्तुत्य असून मनातील भावनांना स्पर्श करणारे आहे असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी मा. व्यवस्थापन परिषेदचे सदस्य डॉ. सचिन मुंबरे म्हाणाले की, नाटकाच्या माध्यमातून समाजातील तरुण वर्ग जागृत व्हावा यासाठी मोलाचा संदेश देण्यात आला आहे. असा समाजात संदेश मिळावा याकरीता असे नाटयप्रयोग सादर करुन जनजागृती करावी असे त्यांनी सांगितले.

   याप्रसंगी कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की,  झी नाटय गौरव आणि सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कारांनी सन्मानित असलेले हे नाटक विद्यापीठाचे मा. कुलगुरु प्रा. संजीव सोनवणे (अतिरिक्त कार्यभार) यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आले हेते. नाटकाच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर प्रबोधन करण्यासाठी ’नाटक’ प्रभावी आहे. अशा कार्यक्रमामुळे अधिकारी व कर्मचारी यांचे कुटुंब एकत्र येतात यामुळे विद्यापीठ परिसराची त्यांना ओळख होते असे त्यांनी सांगितले.
या नाटकाचे लेखक दत्ता पाटील असून दिगदर्शक सचिन शिंदे आहे. कलाकार ओंकार गोवर्धन, आश्विनी कासार, अमेय बर्वे आणि उमेश जगताप आहेत. संगीत ऋषिकेश शेलार यांनी दिले असून पार्श्वसंगीत ऋषिकेश गांगुर्डे यांनी केले. प्रकाशयोजना योगेंद्र साने यांनी केले.  नेपथ्य विक्रम नन्नावरे व प्रसाद चिने पाटील, रंगमंच व्यवस्था अनिकेत खरे यांनी केली.
या कार्यक्रमाचे संयोजन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. आभार प्रदर्शन विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवेंद्र पाटील यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages