गरीबीवर मात करत जावयांना दिल्या दोन दुचाकी; इर्ले येथील शेतकरी पवार दांपत्याचा आदर्श उपक्रम. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, June 14, 2026

गरीबीवर मात करत जावयांना दिल्या दोन दुचाकी; इर्ले येथील शेतकरी पवार दांपत्याचा आदर्श उपक्रम.

गरीबीवर मात करत जावयांना दिल्या दोन दुचाकी; इर्ले येथील शेतकरी पवार दांपत्याचा आदर्श उपक्रम.




इर्ले (कटूसत्य वृत्त):- हौसेला मोल नसते आणि पैशांपेक्षा मनाचा मोठेपणा महत्त्वाचा असतो, हे इर्ले येथील शेतकरी कुटुंबातील पवार दांपत्याने कृतीतून दाखवून दिले आहे.
इर्ले येथील रामचंद्र रंगनाथ पवार व त्यांच्या पत्नी सुनिता पवार यांनी मोलमजुरी करून संसार उभा केला. आर्थिक परिस्थिती साधी असतानाही अधिक मास निमित्त त्यांनी आपल्या दोन्ही जावयांना वैराग येथील ऑटोमोबाईल दुकानातून प्रत्येकी एक अशी हिरो होंडा एच.एफ. डिलक्स दुचाकी भेट दिली. या दोन वाहनांची एकूण किंमत सुमारे १ लाख ६८ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
पवार दांपत्याने आपल्या दोन मुली सख्या दोन भावांना दिल्या असून, थोरले जावई व्यंकटेश काशिनाथ शिंदे व धाकटे जावई शिवाजी काशिनाथ शिंदे हे (रा. निवळी, जि. लातूर) येथील आहेत.
गरीबीची परिस्थिती असूनही मनाचा मोठेपणा जपत पवार कुटुंबाने समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कृतीचे परिसरातून कौतुक होत आहे.
यावेळी धनंजय पवार, लहु पवार, लक्ष्मण पवार, विशाल देवकते आदी मान्यवर उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages