वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालय स्कूल बस सेवेचे उद्घाटन उत्साहात संपन्न. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, June 14, 2026

वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालय स्कूल बस सेवेचे उद्घाटन उत्साहात संपन्न.

 वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालय स्कूल बस सेवेचे उद्घाटन उत्साहात संपन्न




सांगोला (कटूसत्य वृत्त):- शहर व उपनगरीय भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालय यांच्या वतीने मोफत स्कूल बस सेवेला प्रारंभ करण्यात आला. या बसचे उद्घाटन अजिंक्यतारा पतसंस्थेचे चेअरमन गिरीशभाऊ नष्टे , उद्धव पाटील सर, संस्थाध्यक्षा श्रीमती कौशल्यादेवी शिंदे मॅडम, प्रकाश खडतरे , प्रमिला जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस संस्थापक वामनराव शिंदे साहेब यांच्या प्रतिमेस प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
सांगोला शहर व परिसरातील विद्यार्थी व पालकांच्या मागणीची दखल घेत संस्थेने पाचवी ते दहावीमधील विद्यार्थ्यांसाठी ही बस सेवा सुरू केली आहे, त्यामुळे वाडी, वस्तीवरील विद्यार्थ्यांसाठी शाळेत ये– जा करण्याकरता सुरक्षित व नियमित वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे बस सेवेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही अशी माहिती नूतन मुख्याध्यापक विठ्ठलपंत शिंदे सर यांनी दिली. संस्थेच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक करून प्रशालेच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
व एसएससी बॅच विद्यामंदिर 2003 च्या वतीने प्रशालेच्या प्रांगणात विविध वृक्षे  लागवड करण्यात आली व प्रशालेचे मुख्याध्यापक विठ्ठलपंत शिंदे सर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना डॉ शैलेश डोंबे यांनी वृक्ष भेट देऊन दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शहरातील पालक,प्रतिष्ठित नागरिक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages