नातेपुते येथे वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून अनधिकृत पोलीस पाटी लावलेल्या वाहनावर कारवाई - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, June 14, 2026

नातेपुते येथे वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून अनधिकृत पोलीस पाटी लावलेल्या वाहनावर कारवाई

  नातेपुते येथे वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून अनधिकृत पोलीस पाटी लावलेल्या वाहनावर कारवाई


नातेपुते (कटूसत्य वृत्त):- नातेपुते येथील पुणे पंढरपूर रोडवर लोणारी पेट्रोल पंप नजीक नातेपुते पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलीस कर्मचारी हे नाका बंदी करत असताना भिगवन ता.इंदापूर जि.पूणे येथील चारचाकी महिंद्रा कंपनीची पांढऱ्या कलरची स्कार्पिओ वाहन नंबर एम.एच.४२ बी.जे.२१३५ या गाडीचा चालक संतोष कालिदास कदम रा. भिगवन जि.पूणे याने अनधिकृत पोलीस नाव असलेली लाल रंगाची पाटी लावली असता वाहतूक पोलीस कर्मचारी यांनी गाडीत लावलेली पाटी जप्त करून सदरील वाहनावर दंडात्मक कारवाई केली.

                   याबाबत सविस्तर माहिती अशी की, नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी सपोनी विशाल वायकर यांच्या आदेशाने नातेपुते येथील पुणे - पंढरपूर रोडवर लोणारी पेट्रोल पंप नजीक येथे नातेपुते पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलीस कर्मचारी सुधीर हांगे, रमेश बोराटे व पोलीस कर्मचारी हे त्या ठिकाणी नाकाबंदी करत असताना अनेक येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांची तपासणी करीत होते. त्याच दरम्यान त्यांना समोरून येणारी पांढऱ्या कलरची महिंद्रा कंपनीची स्कार्पिओ वाहन नंबर एम.एच.४२ बी.जे.२१३५ ही गाडी दिसली त्यामध्ये चालकाच्या साईटला आत मध्ये डॅशबोर्डवर लाल रंगात पोलीस लिहिलेली पाटी दिसली असता सदर वाहन कोठून आले व कुठे चालले असे विचारले असता वाहन चालक संतोष कालिदास कदम यांनी भिगवन येथून आलो आहे व शिखर शिंगणापूर येथे देव दर्शनास निघालो असल्याचे सांगितले. त्यावेळी वाहतूक पोलीस कर्मचारी सुधीर हांगे, रमेश बोराटे यांनी वाहनामध्ये लावलेल्या पोलीस नावाच्या पाटी बाबत चौकशी केली असता सदर वाहनामध्ये लावलेली पोलीस नावाची पाटी ही अनाधिकृत असल्याचे निदर्शनास आले असून सदर गाडीत लावलेली पाटी जप्त करून स्कार्पिओ वाहनावर दंडात्मक कारवाई केली.अनेकदा वाहतूक पोलिसांकडून आपलं वाहन अडवलं जाऊ नये म्हणून आपल्या वाहनांवर लोक महाराष्ट्र शासन, पोलीस किंवा मग पोलीस बोध चिन्ह लावतात. जेणेकरून वाहतूक पोलिसांनी आपली अडवणूक करू नये असे वाटत असते मात्र पोलिसांच्या नजरेमधून असे प्रकार करणारे वाहन चुकू शकत नाही त्या वाहनांवर योग्य ती कारवाई केली जाते. त्यामुळे शक्यतो आपल्या खाजगी वापराच्या वाहनांमध्ये महाराष्ट्र शासन, पोलीस नावाच्या अनधिकृत पाट्या, लोगो यांचा वापर करू नये अन्यथा पोलीस कारवाईस सामोरे जावे लागेल असे आवाहन नातेपुते पोलीस ठाण्याकडून करण्यात आले आहे.





No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages