एन.के. किड्स स्कूलचा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 17, 2026

एन.के. किड्स स्कूलचा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

 एन.के. किड्स स्कूलचा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न




बाळे (कटूसत्य वृत्त):- राजेश्वरी नगर, बाळे येथील एन.के. किड्स स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 चा प्रवेशोत्सव आणि शाळेचा पहिला दिवस अतिशय उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. चिमुकल्यांच्या निरागस हास्याने आणि पालकांच्या उत्साहाने संपूर्ण शाळा परिसर भारावून गेला होता.
कार्यक्रमाची सुरुवात विद्येची अधिष्ठात्री देवी सरस्वती मातेच्या पूजनाने करण्यात आली. मुख्याध्यापिका श्वेता कस्तुरे, शिक्षिका पुनम कळसाई, रोहिणी आदलिंगे व प्राजक्ता भस्मे यांच्या हस्ते पूजन संपन्न झाले.
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना फुले, फुगे आणि चॉकलेट देत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेचा परिसर रंगीबेरंगी फुगे, आकर्षक कार्टून पात्रे आणि विविध चित्रांनी सजविण्यात आला होता. त्यामुळे शाळेत प्रथमच येणाऱ्या चिमुकल्यांना आनंददायी आणि खेळकर वातावरणाचा अनुभव मिळाला.
शाळेच्या पहिल्या दिवशी काही चिमुकले आई-वडिलांपासून दूर होताना रडत होते, तर काही नवीन मित्रमैत्रिणींसोबत हसत-खेळत शाळेच्या वातावरणात रमून गेले होते. त्यांच्या निरागस भावभावनांनी उपस्थित पालकांचेही मन हेलावून गेले. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि कुतूहल पाहून प्रवेशोत्सवाचे खरे सार्थक झाल्याची भावना व्यक्त होत होती.
हा प्रवेशोत्सव यशस्वी करण्यासाठी सेविका संगीता हेडगडकर व सुनिता शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळेच्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.
नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंद, उत्साह आणि सकारात्मक वातावरणात झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबतची आवड निर्माण होण्यास निश्चितच मदत होणार असल्याचा विश्वास पालकांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages