‘फिट इंडिया संडे ऑन सायकल’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 8, 2026

‘फिट इंडिया संडे ऑन सायकल’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

‘फिट इंडिया संडे ऑन सायकल’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून आरोग्य व पर्यावरण जनजागृती



सोलापूर (कटूसत्य वृत्त) : भारत सरकारच्या ‘फिट इंडिया’ अभियानांतर्गत नागरिकांमध्ये आरोग्य, तंदुरुस्ती आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने रविवारी सकाळी ‘फिट इंडिया संडे ऑन सायकल’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालय येथे सकाळी ६.४५ वाजता कार्यक्रमाला प्रारंभ झाला. यावेळी सायकल रॅली, योगा सत्र, झुंबा डान्स तसेच दोरीउड्या यांसारख्या विविध आरोग्यवर्धक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सायकल रॅलीची सुरुवात पोलीस मुख्यालयातून होऊन शहरातील प्रमुख मार्गांवरून अलंकार हॉल येथे समारोप करण्यात आला.

या कार्यक्रमात पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, विद्यार्थी, विविध सायकलिंग गटांचे सदस्य तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. सायकलिंगद्वारे आरोग्य संवर्धन, इंधन बचत आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.

सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही सायकल रॅलीत सहभागी होत फिटनेस आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

नागरिकांनी नियमित व्यायाम, सायकलचा वापर आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages