महामार्गबद्दल लोकांच्या मनात अनेक गैरसमज - आ. रणजितसिंह मोहिते पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, May 19, 2026

महामार्गबद्दल लोकांच्या मनात अनेक गैरसमज - आ. रणजितसिंह मोहिते पाटील

 महामार्गबद्दल लोकांच्या मनात अनेक गैरसमज - आ. रणजितसिंह मोहिते पाटील


अकलूज (कटूसत्य वृत्त):- माढा मतदार संघातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला विरोध होण्याचे दोन प्रकार आहेत. काही लोक पैसे वाढवून मिळावे म्हणून विरोध करताहेत तर काही लोक रस्ताच नको म्हणून विरोध करत आहेत. या महामार्गबद्दल लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. मिळणाऱ्या मोबदल्यामधून सरकार 20 टक्के कपात करणार आहे. तर काही लोकांना वाटते आहे कि सरकार यातून जीएसटी कपात करणार आहे. संभ्रमात असलेल्या लोकांना, शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गची सद्यस्थिती, मिळणारा मोबदला, सर्व्हिस रोड, अंडरपास, रिंगरोड, जुनी, नवी आलाइनमेंट व इतर सर्व गोष्टीची माहिती व्हावी याकरिता व हा अंतिम सर्वे नाही. त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये. महामार्ग बाधित लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी म्हणून शिवरत्न बंगला, यशवंतनगर -अकलूज येथे आज बैठक आयोजित करण्यात आली होती.

जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार उत्तमराव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अर्जुनसिंह मोहिते पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील, सयाजीराजे मोहिते पाटील, शक्तिपीठ महामार्गचा सर्वे केलेली मुनाच सर्वेअर कंपनी, पुणे चे अधिकारी, माढा मतदार संघातून आलेले बाधित शेतकरी, स्थानिक नेते मोठ्या संख्येने हजर होते.

शक्तिपीठ महामार्ग कोठून सुरु होतो. सोलापूर जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यातील किती गावे, किती एकर क्षेत्र बाधित होतेय यांची अभ्यासपूर्ण माहिती आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उपस्थिताना दिली. बाधित शेतकऱ्यांच्या असलेल्या समस्या अधिकाऱ्यांसमक्ष विचारण्यात आल्या. त्यावर सर्व्हेअर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी समर्पक उत्तरे दिली. 

चौकट - 
रस्त्याच्या दोन्ही बाजूला भिंती आहेत. मग आम्ही आमच्या शेतात कुठून जाणार, पाईपलाईन कशी नेणार हा शेतकऱ्यांचा एक महत्वाचा प्रश्न होता. त्यावर उत्तर देताना अधिकारी म्हणाले, प्रत्येक 500 मीटर अंतरावर अंडरपास असणार आहे. पाईपलाईन नेण्यासाठी रस्त्याखालून डक ठेवण्यात येणार आहेत. सर्व्हिस रोडही असणार आहेत.

चौकट - 
महामार्गाचा सर्वे 2023 साली झाला आहे. त्यानंतर त्या क्षेत्रामध्ये अनेक बदल झाले असतील. नवीन घरे, विहिरी, पाईपलाईन, झाडे लावली गेली असतील. अजून संयुक्त मोजणी झालेली नाही. वनखाते, कृषी विभाग, महसूल, इरिगेशन व इतर विभाग यांची पाहणी करून घर, झाडे व इतर गोष्टीचे वय ठरवतील व त्यानुसार पंचनामा होऊन मूल्यांकन करण्यात येईल. वर्ग 2 ची जमीन असेल तर 10 टक्के रक्कम कपात करण्यात येणार आहे. 

चौकट - 
शक्तिपीठ महामार्गाला त्या त्या भागातील रेडी रेकनर चा दर गृहीत न धरता सगळ्या जमिनीना सरसकट समान दर धरण्यात यावा. रेडी रेकनरच्या तफावतीमुळे खूप नुकसान होते आहे. नवीन झाडे लावलेल्यानाही नुकसान भरपाई मिळावी. ज्यांना आर्थिक मोबदला नको असेल अशांना एक एकर जमीन जात असेल तर नुकसान भरपाई म्हणून चार एकर जमीन दुसरीकडे मिळावी अशाही मागण्या शेतकऱ्यांकडून करण्यात आल्या.

चौकट - 
ही बैठक शेवटची नाही. मी लवकरच माढा मतदार संघातुन महामार्ग जाणाऱ्या सर्व गावाचा दौरा करून बाधित शेतकऱ्यांच्या समस्या समूजून घेणार आहे. त्या समस्या नंतर मी सरकार समोर मांडणार आहे.
खासदार धैर्यशील मोहिते पाटील 

चौकट - 
सरकारने बाधित शेतकरी, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी या महामार्गा विषयी चर्चा करावी. सरकार जर पोलीस बळाचा वापर करून जमीन घेण्याचा प्रयत्न करेल तर त्यास आम्ही कडाडून विरोध करू.
आमदार उत्तमराव जानकर 

चौकट - 
सहमतीने जमीन दिली तर 2023, 24 व 25 मधील जो सर्वात जास्त रेडी रेकनरचा दर असेल तो देणार. आणी जर काही बाबींविषयी हरकत असेल तर चार पट दर देणार. हरकती मिटल्यानंतर राहिलेला एक पट दर देणार असल्याची माहिती सर्व्हेअर यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages