संभाजी ब्रिगेड च्या वतीने आरोपीचा भर चौकात जाळला पुतळा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पुणे येथील नरसापुर या गावी झालेल्या चिमुरडीवर अत्याचाराच्या निषेधार्य संभाजी ब्रिगेडच्या वतीने चार हुतात्मा चौकात गुन्हेगार आरोपी भीमा कांबळे यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळून आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्रात वारंवार महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत मुख्यमंत्री गृहमंत्री हे निष्क्रिय झाले असून गृहमंत्री पदाचा स्वतंत्र पदभार राज्य शासनाने निर्माण करावा महिला वरील अत्याचारासंदर्भात जलद न्यायालयाची स्थापना करण्यात यावी महाराष्ट्र शासनाने तात्काळ अधिवेशन बोलावून महिलां अत्याचार संदर्भात स्वतंत्र कायदा करण्यात यावा बलात्काराला भर चौकात तात्काळ फाशी देण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मिनल दास जिल्हा उपाध्यक्ष मनीषा कोळी, संजीवनी सलबत्ते, शहर कार्याध्यक्ष सोनाली सगर,सरोजिनी माकाई,अनिता वाघमारे, जयश्री रानसरजे उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष संतोष सुरवसे उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष विक्रम वानकर जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले जिल्हा सचिव दत्तात्रय डिंगणे कृष्णा पवार आदी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment