८४ शिक्षकांचे वेतन अदा करा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यातील अंशत: अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे वेतन अदा करा.अशी मागणी प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्याकडे केल्याची माहीती माहीती डाॅ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेश महासचिव सुनिल चव्हाण यांनी दिली.
१९ सप्टेंबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील १६२८ शाळा व २४५२ तुकड्या २०% अनुदानासाठी पात्र ठरविण्यातआल्या होत्या.जिल्हातील २० शाळा व ८४ शिक्षक त्यानुसार अनुदानास पात्र ठरले.तात्कालीन शिक्षण संचालकांच्या १७ एप्रिल २०१७ च्या आदेशानुसार अनुदानपात्र शाळांतील शिक्षकांना शालार्थ आयडी देण्यात आले.या शाळांचे डिजिटलायजेशन करताना कागदपत्र अपलोड होण्यास अडचणी येत असल्याच्या कारणावरुन संबंधित शाळांची वेतन देयके रिजेक्ट करण्यात आली आहेत.त्यामुळे या शिक्षकांचे वेतन अदा होणार नाही.तात्कालिन अंशत: अनुदानित शाळेतील शिक्षकांना स्वतंत्र शालार्थ आयडी आदेश नसल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे.डाॅ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद,महाराष्टृ राज्य शिक्षक सेना,युवक शिक्षक कर्मचारी संघटना व अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघटनेच्यावतीने या शिक्षकांचे वेतन अदा करण्यात यावे.यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्याशी चर्चा करण्यात येईल.असे आप्पाराव इटेकर,विनोद आगलावे,वल्लभ चौगुले व अ.गफुर अरब प्रयत्नशील आहेत.
चौकट-
*संबंधित शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांना शिक्षण संचालकांनी शालार्थ आयडी दिले आहेत.स्वतंत्र आदेश नसल्यामुळे कागदपत्रे अपलोड होत नाहीत.या शाळांतील शिक्षकांचे वेतन अदा करण्यात यावे.*
सुनिल चव्हाण, प्रदेश महासचिव डाॅ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद

No comments:
Post a Comment