सोलापूरात इंजिनिअरिंग शिक्षणाला मोठी चालना - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, May 7, 2026

सोलापूरात इंजिनिअरिंग शिक्षणाला मोठी चालना

 सोलापूरात इंजिनिअरिंग शिक्षणाला मोठी चालना




तीन नवे पदवी अभ्यासक्रम सुरू

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोलापूर व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून अभियांत्रिकी शिक्षणाला नवी दिशा मिळणार आहे.

शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर येथे सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून पदवी स्तरावरील तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

या अंतर्गत आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशिन लर्निंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या तीन अभ्यासक्रमांचा समावेश असून प्रत्येक अभ्यासक्रमासाठी ६० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता निश्चित करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सोलापूरसह आसपासच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षणासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या या निर्णयांमुळे राज्यातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल अपेक्षित असून विद्यार्थ्यांसाठी नवे मार्ग खुलणार आहेत.

याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमार्फत चालविण्यात येणारे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. या हस्तांतरणामुळे महाविद्यालयाचे सक्षमीकरण होऊन अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होतील, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अधिक संधी मिळेल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages