चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय वधू-वर परिचय संमेलन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीने यंदाही समाजातील उपवर, युवक, युवती, घटस्फोटीत, विधवा आणि विधूर यांच्यासाठी राज्यस्तरीय वधू-वर परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ३१ मे २०२६ रोजी जामगुंडी लॉन्स, आसरा चौक, जुळे सोलापूर येथे हा मोफत वधू-वर परिचय संमेलन आयोजित करण्यात आला असल्याची माहिती मुख्य निमंत्रक राजशेखर जेऊरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यंदा राज्यस्तरीय वधू-वर परिचय संमेलनाचे दुसरे वर्ष असून आंध्र, कर्नाटकसह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातून वधू-वर आणि त्यांचे पालक उपस्थित राहणार आहेत.
पालक आणि इच्छुकांचे प्रबोधन करुन योग्य, अनुरूप जोडीदार लाभावा यासाठी चर्मकार समाज विकास मंडळ या संमेलनाच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे.
मागील वर्षी झालेल्या संमेलनात ९६० वधू-वर यांची नोंदणी झाली हाेती. या मेळाव्याला १६०० वधू वर उपस्थित राहणार आहेत. यंदाही राज्यभरातून इच्छुक उमेदवार आणि पालक येत आहे
रविवार 31 मे रोजी सदर कार्यक्रम संपन्न होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायगड जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे राहणार असून कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण सोलापूरचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांच्या हस्ते होणार आहे.प्रमुख अतिथी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधव गायकवाड हे चर्मकार समाजाची दशा व दिशा या विषयास अनुसरून ते उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमास पूर्वा भारत वाघमारे, शुभांगी सुनील माने, हरिदास टोणपे, सुभाष सावस्कर, दत्ता शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या पत्रकार परिषदेस वधु वर परिचय संमेलन नियोजन समितीचे प्रमुख वामन धुळराव ,परशुराम शिंदे ,सदाशिव कांबळे ,काशिनाथ वाघमारे,मल्हारी बनसोडे, दत्ता शिंदे ,शिवपुत्र हरवाळकर ,दत्ता हरवाळकर ,अंबादास वाघमारे,संगीता शिंदे ,सुनिता वनस्कर,रेवणसिद्ध व्हनमराठे ,शावरप्पा वाघमारे,सुजाता हरवाळकर,राजश्री कांबळे पोर्णिमा धूळराव, इत्यादी उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment