बार्शी कृषी विभागाची धडक कारवाई; 7.52 लाखांचे बोगस उडीद बियाणे जप्त
बार्शी (कटूसत्य वृत्त):- कृषी विभागाने मोठी कारवाई करत नकली उडीद बियाण्यांचा साठा जप्त केला असून हजारो शेतकऱ्यांची संभाव्य फसवणूक टळली आहे. स्वराज कॉलनी परिसरातील एका गोडाऊनवर छापा टाकून तब्बल 384 बॅग बोगस बियाणे ताब्यात घेण्यात आले.
कृषी विभागाच्या तपासात संबंधित बियाणे हे नामांकित कंपनीच्या ‘विश्वास’ वाणाची हुबेहूब नक्कल करून विक्रीसाठी आणल्याचे समोर आले आहे. जप्त करण्यात आलेल्या बियाण्यांची एकूण किंमत ₹7 लाख 52 हजार 640 इतकी असून प्रत्येक बॅगची किंमत ₹1960 असल्याची माहिती देण्यात आली.
या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, कृषी विभागाने शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करताना अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करण्याचे तसेच पक्के बिल घेण्याचे आवाहन केले आहे.
.png)
No comments:
Post a Comment