शासनाच्या आदेशाप्रमाणे म.न.पा शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळावे-विष्णू कारमपुरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 29, 2026

शासनाच्या आदेशाप्रमाणे म.न.पा शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळावे-विष्णू कारमपुरी

 शासनाच्या आदेशाप्रमाणे म.न.पा शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळावे-विष्णू कारमपुरी


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या अध्यादेशाप्रमाणे महानगरपालिका प्राथमिक शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करावे अशा मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने महानगरपालिका शिक्षणाधिकारी सहाय्यक आयुक्त डॉ.रत्नराज जवळगेकर साहेब यांना कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज)यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले*
       *मा सहाय्यक आयुक्त म.न.पा यांना देण्यात आलेल्या निवेदनात सोलापूर शहर हे गरीब कामगारांचे शहर असून कामगार वर्ग केलेल्या काबाड कष्टातून आपल्या पाल्यांना शिक्षण शिकवण्याचा प्रयत्न करतात त्यातून या महागाईच्या दिवसात त्यांचे जगणे कठीण झाले आहे या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासन इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत प्राथमिक शिक्षण शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय पोषाख पूर्ण वर्षभर टिकला पाहिजे या उद्देशाने शैक्षणिक संस्थांसाठी शालेय गणवेश वाटपाचे अध्यादेश काढले आहे या अध्यादेशात एकूण १४ सूचनांचा समावेश करण्यात आला आहे असून यातील सूचना क्रमांक ५ मधील उपसूचना क्रमांक IV या सूचनेत मोफत गणवेश योजनेअंतर्गत वाटप करण्यात येणारे गणवेश विद्यार्थी शाळेत नियमित परिधान करीत असल्याने शाळा व्यवस्थापन समितीने गणवेश खरेदी करताना कापड चांगल्या दर्जाचे व विद्यार्थ्यांच्या शरीराला त्वचेला इजा न करणारे असल्याचे दक्षता घ्यावी तसेच सदर कापड 100% पॉलिस्टर नसावे याची खात्री करण्यात यावी असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे*
    *शासनाच्या आदेशावरून गणवेश वाटप करणे गरजेचे आहे कारण यापूर्वी शासनाकडून गणवेश वाटप करण्यात आले त्यावेळी रेडिमेड व्यापारांच्या मागणीनुसार शासनाने गणवेश वाटप बंद करून परत शालेय समितीकडे दिले आहे आणि शिक्षणाधिकारी यांना गणवेश वाटप शासनाच्या आदेशाप्रमाणे अंमलबजावणी करण्यास पूर्ण अधिकार दिले आहे तरी माननीयानी सोलापुरातील महानगरपालिका शाळेतील प्राथमिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी- विद्यार्थिनींना शासनाच्या आदेशाप्रमाणे गणवेश वाटप करण्यात यावे असे नमूद करण्यात आले आहे*
     *विष्णू कारमपुरी महाराजांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणारा शिष्टमंडळात विठ्ठल कुराडकर रेखा आडकी गुरुनाथ कोळी सविता दासरी प्रसाद जगताप लक्ष्मीबाई मुल भारत देवकुळे,लक्ष्मीबाई गुठला आदींचा सहभाग होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages