सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये ‘IDE बूटकॅम्प 2026’चा चौथा दिवस उत्साहात
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगाव येथे सुरू असलेल्या पाच दिवसीय ‘IDE बूटकॅम्प 2026’चा गुरुवारी चौथा दिवस उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी इनोव्हेशन, डिझाईन आणि उद्योजकता संकल्पनांवर आधारित विविध कल्पना सादर करत त्यांना प्रत्यक्ष प्रकल्पांच्या रूपात विकसित करण्याचा प्रयत्न केला.
बूटकॅम्पदरम्यान तज्ज्ञ वक्त्यांनी विद्यार्थ्यांना आयडिया जनरेशन, डिझाईन थिंकिंग, प्रोटोटायपिंग आणि स्टार्टअप उभारणीसंदर्भात मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी गटांमध्ये काम करत विविध सामाजिक व औद्योगिक समस्यांवर उपाय शोधण्याचे प्रयत्न केले. मार्गदर्शकांच्या सहकार्याने या कल्पनांना व्यावहारिक रूप देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे दिसून आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रमाची दृष्टी विकसित होत असून, उद्योजकतेकडे वाटचाल करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यास मोठी मदत होत आहे. बूटकॅम्पच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे सादरीकरण होणार असून, उत्कृष्ट संकल्पनांना पुढील स्तरावर मार्गदर्शन मिळणार आहे.
.png)
No comments:
Post a Comment