श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- तपोरत्न योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांची ९६ वी जयंती, श्री श्री श्री १००८ जगद्गुरु दारूकाचार्य व एकोरामाराध्य जयंती व घोंगडीवर बसून भीमा नदी ओलांडलेले पवाड पुण्य पुरुष चन्नबसव शिवाचार्य महास्वामीजी यांची पुण्यतिथी निमित्त प्रति वर्षाप्रमाणे यंदाही शनिवार दि.१८ एप्रिल ते २१ एप्रिल पर्यंत श्री बृहन्मठ होटगी ता. द. सोलापूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली. शनिवार दिनांक १९ एप्रिल ते २१ एप्रिल पर्यंत दररोज श्री श्री श्री १००८ जगदाचार्य मूर्तीस व श्री गुरु गादीस रुद्राभिषेक, रविवार १९ एप्रिल रोजी जगद्गुरु एकोरा माराध्य जयंती निमित्त काशी पिठाचे जगद्गुरु डॉ.मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृत हस्ते व अनेक शिवाचार्यांच्या उपस्थितीत वेदमूर्ती परमेश्वर शास्त्री व हल्लाळी शास्त्री यांच्या वैदिकत्त्वाखाली अय्याचार व दीक्षा विधी संपन्न होणार आहे. तरी ज्या माहेश्वर बटूंना व वीरशैव बांधवांना अय्याचार व दीक्षा करून घ्यावयाचे आहे. त्यानी मौजे होटगी येथील मठात आपले नावे नोंदवावीत. मंगळवार दि.२१ एप्रिल रोजी श्री श्री श्री १००८ जगद्गुरु दारूकाचार्य जयंती व श्री चन्नबसव शिवाचार्य यात्रा महोत्सवानिमित्त सकाळी ८.०० वा. जगद्गुरु दारूकाचार्य मूर्तीची मिरवणूक होऊन महामंगलारती व त्यानंतर महाप्रसाद वाटप होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमात भक्तानी व जंगम बटूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्या वतीने करण्यात आलेले आहे.
.png)
No comments:
Post a Comment