शाश्वत विकास ध्येय विकासाच्या कृतीसाठी जिल्हा परिषद सदस्यांनी पुढाकार घ्यावा - उपमहासंचालक डॉ. कलशेट्टी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 17, 2026

शाश्वत विकास ध्येय विकासाच्या कृतीसाठी जिल्हा परिषद सदस्यांनी पुढाकार घ्यावा - उपमहासंचालक डॉ. कलशेट्टी

 शाश्वत विकास ध्येय विकासाच्या कृतीसाठी जिल्हा परिषद सदस्यांनी पुढाकार घ्यावा - उपमहासंचालक डॉ. कलशेट्टी




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शाश्वत विकास ध्येय विकासाच्या कृतीसाठी जिल्हा परिषद सदस्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन  यशदाचे उपमहासंचालक डॉ.  मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आज जिल्हा परिषद च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीचे सभापती यांच्यासाठी एक दिवसीय प्रशिक्षणाचे  आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.  याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार, समाजकल्याण विभागाच्या सभापती संस्कृती सातपुते, कृषि व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी,  महिला व बालकल्याण समितीचे सभापती अॅड. अमृता वाघे,  जिल्हा परिषदेचे  नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी संदीप कोहिणकर, यशदाचे उपसंचालक आनंद पुसावळे, माजी  मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह  मित्रगोत्री,  उपसंचालक  वित्त रमेश लिदडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांचेसह जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीचे सभापती व  खातेप्रमुख हे प्रमुख उपस्थित होते. प्रास्तविक व स्वागत उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी केले. प्रशिक्षणाचे सुत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले. या प्रशिक्षणासाठी कक्ष अधिकारी सचिन साळुंखे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, साप्रवि मधील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. 

*स्वच्छता दूत म्हणून काम करण्याचा निर्धार करा - डाॅ. कलशेट्टी* 

स्वच्छता दूत म्हणून काम करण्याचा निर्धार करा असे आवाहन  डाॅ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, १५ वा वित्त आयोगात ६० टक्के रक्कम पाणी व स्वच्छता व इतर ४० टक्के रक्कमेचे आराखड्यात नियोजन करा.  स्वच्छतादूत म्हणून काम करा. प्लास्टिक हटवा. प्लास्टिक पुनर्वापर करा. मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान प्रभावी राबवा. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. शाश्वत विकास ध्येय आपण सर्वांनी स्वीकारलेले या संकल्पनाचे मतदारसंघ न्याय नियोजन करावे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या प्रत्येक मुद्द्यावर डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मार्गदर्शन केले तरी तसेच प्लास्टिक व्यवस्थापन यावर देखील मार्गदर्शन करून त्यांनी स्वच्छतेसाठी पुढाकार घेण्याची आवाहन  जिल्हा परिषद सदस्य यांना केले. सिईओ कुलदीप जंगम यांचे विनंतीनुसार  या प्रशिक्षणाचे आयोजन करणेत आले होते. या प्रसंगी उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी १५ वा व १६ वा वित्त आयोगातील बंधित व अबाधित निधीच्या मार्गदर्शक सुचनांची माहिती सदस्यांना द्यावी अशी मागणी केली. या प्रसंगी सभापती अमृता वाघे यांनी मनोगत व्यक्त केले. उपसंचालक आनंद पुसावळे यांनी सोप्या भाषेत जिल्हा परिषद व पंचायत समिती सभेच्या कामकाजाची माहिती दिली. 
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमातील महत्त्वाच्या तरतुदी व जिल्हा परिषद व पंचायत समिती रचनेबाबत माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री  यांनी मार्गदर्शन केले.  

*अधिकारी व कर्मचारी यांचेशी समन्वय साधा- माजी सभापती बुट्टे पाटील*

जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघाचे आदर्श नियोजन या विषयावर शरद बुट्टे पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्यांना मार्गदर्शन करून सदस्यांनी अधिकारी व कर्मचारी यांचेशी समन्वय साधून काम करावा. भांडणात वेळ घालवून विकास कामांवर परिणाम होऊ देऊ नका. अभ्यास करून अधिकारी यांचेशी चर्चा करा असे आवाहन केले.

*जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजित पवार पाठीमागील बाकावर..!*

आज नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्यांसाठी आयोजित प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष व सभापती चेतनसिंह केदार, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी यांनी सभागृहांचे पाठी मागील खुर्चीवर बसून प्रशिक्षण घेतले. प्रमुख पदाधिकारी यांनी दाखविलेली नम्रता आज चर्चेचा विषय होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages