नुतन सिईओ कुशल जैन यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींकडून स्वागत
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा परिषदेचे नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्वागत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. जिल्हा परिषदेच्या
यशवंतराव चव्हाण सभागृहात आज नुतन जिल्हा परिषद व सभापती यांचेसाठी प्रशिक्षणाचे आयोजन यशदा पुणे व जिल्हा परिषदेच्या वतीने करणेत आले होते. या प्रसंगी सिईओ कुशल जैन यांनी भेट दिलेनंतर सर्व जिल्हा परिषदेच्या वतीने सिईओ कुशल जैन यांचे पदाधिकारी यांनी स्वागत केले. प्रसंगी यशदा चे उप महासंचालक डाॅ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मी विकास यात्री पुस्तक देऊन सिईओ जैन यांचे स्वागत केले. या प्रसंगी शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार, समाजकल्याण विभागाच्या सभापती संस्कृती सातपुते, कृषि व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समितीचे सभापती अॅड. अमृता वाघे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील , उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे सदस्य यांनी नुतन सिईओ कुशल जैन यांना भेटून संवाद साधून स्वागत केले.

No comments:
Post a Comment