चित्रकला ही भाषेशिवाय संवाद साधते- मल्हारी माने
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- चित्रकला ही केवळ कागदावर रंग भरणे नसुन ती एक भाषा आहे.जी शब्दाशिवाय संवाद साधते.असे मत प्रशासनाधिकारी मल्हारी माने यांनी व्यक्त केले.
डाॅ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्यावतीने शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या रंगभरण स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ नुकताच पार पडला.यावेळी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर जि.प.सदस्य पृथ्वीराज माने,सुनिल चव्हाण, संजीव चाफाकरंडे,उल्हास बिराजदार, विनोद आगलावे,नागनाथ वडणे,सचिन चौधरी,अ.गफुर अरब आदी उपस्थित होते.
शिवजयंतीनिमित्त संघटनेच्यावतीने जिल्हास्तरीय रंगभरण स्पर्धा चार गटात पार पडली.प्रत्येक गटातुन प्रथम,द्वितीय,तृतीय व उत्तेजनार्थ यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.चित्रकला ही मनातील संकल्पना व्यक्त करते.कला माणसाचा ताणतणाव कमी करते.असे मत पृथ्विराज माने यांनी व्यक्त केले.यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनिल गायकवाड, दिपक डांगे,श्रीराम जाधव,किरण गाटे,भाऊसाहेब पवार,धन्यकुमार स्वामी,सागर स्वामी यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अतुल नारकर यांनी तर दिपक डांगे यांनी आभार मानले.
.png)
No comments:
Post a Comment