चिंचोली भोसे येथे रस्ता दुरुस्तीसाठी ₹२० लाखांचा निधी मंजूर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 24, 2026

चिंचोली भोसे येथे रस्ता दुरुस्तीसाठी ₹२० लाखांचा निधी मंजूर

 चिंचोली भोसे येथे रस्ता दुरुस्तीसाठी ₹२० लाखांचा निधी मंजूर


 आ अभिजीत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- चिंचोली भोसे, ता. पंढरपूर येथील ग्रामस्थांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या रस्ता दुरुस्तीच्या मागणीची गांभीर्याने दखल घेत  ₹२० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकासकामाचे भूमिपूजन आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या शुभहस्ते ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त व मोठ्या उपस्थितीत संपन्न झाले.

चिंचोली भोसे परिसरातील रस्त्याची दुरवस्था ही नागरिकांसाठी मोठी समस्या बनली होती. खराब रस्त्यांमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत होते तसेच शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. मात्र, आता या निधीमुळे रस्त्याचे दर्जेदार दुरुस्ती काम हाती घेतले जाणार असून, लवकरच नागरिकांना सुकर व सुरक्षित वाहतुकीचा लाभ मिळणार आहे.

यावेळी बोलताना आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले की, “मतदारसंघातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय असून, नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत. रस्ते, पाणी, वीज यांसारख्या सुविधांमध्ये कोणतीही तडजोड होऊ दिली जाणार नाही.”

या कार्यक्रमास उमेश पवार, गणेश आवटे, भीमराव पवार, शशिकांत शिंदे, परमेश्वर पवार, बाळासाहेब पवार, रामभाऊ परचंडे यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कामामुळे परिसराच्या विकासाला गती मिळणार असून, ग्रामस्थांनी आमदार अभिजीत पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages