प्रताप क्रीडा मंडळाच्या मोफत उन्हाळी क्रीडा व कला प्रशिक्षण शिबिराचा प्रारंभ
अकलूज (कटूसत्य वृत्त):- ग्रामीण भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळांचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, त्यांना उत्कृष्ट प्रशिक्षण मिळावे तसेच त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज यांच्या वतीने मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील, स्पर्धा संयोजन समिती प्रमुख सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२३ ते २६ एप्रिल या कालावधीत आयोजित केलेल्या मोफत उन्हाळी क्रीडा व कला प्रशिक्षण शिबीराचा प्रारंभ झाला.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय शंकरनगर च्या मैदानावर या स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.या वेळी मंडळाचे उपाध्यक्ष पोपटराव भोसले पाटील, संजय झंजे,सागर फुले, राष्ट्रीय खेळाडू सार्थक काळे, सुजल धडांबे,सचिव बिभीषण जाधव, कला व क्रीडा प्रशिक्षक, आदी मान्यवर प्रमूख उपस्थित होते.
सदरचे हे ४५ वे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर असून शिबिरामुळे अनेक राज्य व राष्ट्रीय खेळाडू तयार झाले आहेत. प्रताप क्रीडा मंडळाने राज्यात वेगळा ठसा उमटवलेला आहे. सदरचे शिबिर विद्यार्थ्यांसाठी मोफत असून या शिबिरात रोज सकाळी ७ ते १० या वेळेत वेटलिफ्टिंग, हॉलीबॉल, ॲथलेटिक्स, कबड्डी व योगासने या खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. कला शिबिरामध्ये कागदकाम व रांगोळी कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले असल्याचे उपाध्यक्ष पोपटराव भोसले पाटील यांनी सांगितले.
क्रीडा प्रशिक्षक म्हणून अरविंद वाघमोडे,संजय राऊत ,उमेश भिंगे, भीमाशंकर पाटील, प्रदीप पांढरे, दादा कोकाटे, निलप्पा बनसगोळकर, यशवंत माने देशमुख, भीमराव दुधाळ, मल्हारी मगर, दादाभाई सय्यद, अनिल मोहिते, अण्णा साळुंखे, रामचंद्र लोंढे, बाळासाहेब भोसले तर कला शिबिरासाठी धन्यकुमार साळवे, सिद्धनाथ टिंगरे, दत्ता शिंदे, तानाजी काशीद, विशाल लिके, लक्ष्मण धोत्रे, शाम कुंभार, माधुरी भांगे आदी मार्गदर्शन करीत आहेत.सुत्रसंचलन संजय राऊत यांनी केले. प्रशिक्षणार्थिना मंडळाच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले.

No comments:
Post a Comment