प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दुसऱ्या दिवशीही संप सुरू - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 24, 2026

प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दुसऱ्या दिवशीही संप सुरू

 प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दुसऱ्या दिवशीही संप सुरू


सोलापूर (कटूसत्य वृत्त) : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या १८ प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार (दि. २१ एप्रिल) पासून पुकारण्यात आलेला बेमुदत संप बुधवारी दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचा दावा कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी केला असून, शंभर टक्के सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या संपातून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी माघार घेतली आहे. तरीही काही अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू ठेवण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयातील पोस्टमार्टम विभाग, ऑक्सिजन पुरवठा विभाग तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहण व ध्वज उतरविण्याचे काम करणारे कर्मचारी नियमितपणे कर्तव्य बजावत असल्याची माहिती महसूल संघटनेचे अध्यक्ष रवी नष्टे व माजी अध्यक्ष शंतनु गायकवाड यांनी दिली.

संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठविण्यात आले आहे. मात्र, संपामुळे शासकीय कार्यालयांमधील कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असून, नागरिकांची कामे खोळंबण्याची चिन्हे आहेत.

या संपात महसूल, कारागृह, वाहनचालक, लेखा व कोषागार, आयटीआय, आरोग्य तसेच तालुका स्तरावरील विविध विभागांतील कर्मचारी सहभागी झाले आहेत. शासनाने मागण्यांबाबत अधिकृत निर्णय (जीआर) जारी करेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.

राज्यभरातील सुमारे १७ लाख कर्मचारी व शिक्षक गेल्या वर्षभरापासून विविध मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहेत. यासाठी त्यांनी ६ मार्च २०२५ रोजी धरणे आंदोलन, २० मे रोजी वॉकआऊट, ९ जुलै रोजी राज्यव्यापी निदर्शने, ११ नोव्हेंबर रोजी उग्र आंदोलन, ५ डिसेंबर रोजी शाळा बंद आंदोलन आणि ९ ते ११ डिसेंबरदरम्यान नागपूर येथे साखळी उपोषण असे विविध टप्प्यांतील आंदोलन केले होते. मात्र, शासनाकडून अद्याप ठोस निर्णय न झाल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages