शिवरत्न तर्फे अकलूजमध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन
अकलूज (कटूसत्य वृत्त):- आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूज येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिवरत्न शिक्षण संस्था व श्री शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे अशी माहिती शिवरत्न संस्थेच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते पाटील यांनी दिली.
या नोकरी मेळाव्यात विविध कंपन्यांमध्ये ७०० पेक्षा अधिक पदांसाठी भरती होणार असून नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे परिसरातील बेरोजगार युवक-युवतींसाठी ही एक मोठी संधी ठरणार आहे.
मेळाव्याचे आयोजन दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता शिवरत्न नॉलेज सिटी, शिवामृत रोड, शंकरनगर, अकलूज येथे करण्यात आले आहे.
उमेदवारांनी आपले अद्ययावत बायोडेटा, शैक्षणिक कागदपत्रे व आवश्यक प्रमाणपत्रांसह उपस्थित राहावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

No comments:
Post a Comment