पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज सोलापूरात मॅरेथॉन आढावा बैठका
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पालकमंत्री जयकुमार गोरे हे आज सोमवारी सोलापूर दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत विविध विभागांच्या मॅरेथॉन आढावा बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. दिवसभरात विविध शासकीय कामांचा आढावा घेण्यासह अनेक कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.
सकाळी ८.३० वाजता भाजप स्थापना दिनानिमित्त भाजप कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता जिल्हा नियोजन भवन येथे अरण येथील श्री संत सावता महाराज स्मारकाच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. दुपारी १२ वाजता जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर स्मारकाच्या कामाचाही आढावा घेतला जाणार आहे.
यानंतर विविध परिषद पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा होणार असून दुपारी १.३० वाजता महानगरपालिका पदाधिकाऱ्यांसोबत शहराशी संबंधित प्रश्नांवर सविस्तर बैठक होईल. दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील विविध प्रशासकीय विषयांवर महत्त्वाची आढावा बैठक पार पडणार आहे.
दुपारी ४.३० वाजता कोटणीस कॉम्प्लेक्स येथे सोलापूर महानगरपालिकेच्या नागरी सेवा सुविधा केंद्र इमारतीच्या कामाचा भूमिपूजन समारंभ पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार आहे.
No comments:
Post a Comment