पावसाच्या नुकसानीपोटी ५.४० कोटींचा निधी मंजूर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 23, 2026

पावसाच्या नुकसानीपोटी ५.४० कोटींचा निधी मंजूर

 पावसाच्या नुकसानीपोटी ५.४० कोटींचा निधी मंजूर





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेल्या पूर्वमोसमी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले होते, या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ७ एप्रिल रोजी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता.

प्रशासनाच्या तत्पर पाठपुराव्यामुळे अवघ्या आठवड्यात शासनाने ५ कोटी ४० लाख रुपयांची मदत मंजूर केली असून, यामुळे जिल्ह्यातील ४ हजार ७१ बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या मदतीमुळे २ हजार ७७७ हेक्टरवरील बाधित पिकांना आधार मिळणार आहे, यातील सर्वाधिक फटका मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. मोहोळमधील सर्वाधिक २ हजार ५२७ शेतकऱ्यांसाठी ३ कोटी २८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

त्याशिवाय सांगोला तालुक्यातील ४८९, माळशिरस तालुक्यातील ३७५, उत्तर सोलापुरातील २६५, मंगळवेढा तालुक्यातील १८६, अक्कलकोट तालुक्यातील १८३, माढ्यातील ३९ आणि पंढरपूर तालुक्यातील ७ शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.

निधी मंजूर झाल्यामुळे आता पुढील कार्यवाही केली जात असून, लवकरच ही रक्कम बाधितांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे.

नुकसानीचे क्षेत्र आणि कंसात लाभार्थी शेतकरी संख्या

जिरायती पिके: १७८ हेक्टर (३३० शेतकरी)

बागायती पिके: १,०७६ हेक्टर (१,४८६ शेतकरी)

फळबागा: १,५२१ हेक्टर (२,२५५ शेतकरी)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages