मड्डी वस्तीत ५१ फुटी बजरंगबली मूर्ती साकार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 2, 2026

मड्डी वस्तीत ५१ फुटी बजरंगबली मूर्ती साकार

 मड्डी वस्तीत ५१ फुटी बजरंगबली मूर्ती साकार

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच अनावरण



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरातील मध्यवर्ती भागातील मड्डी वस्ती परिसरात वडार समाजाच्या वतीने तब्बल ५१ फूट उंचीची भव्य बजरंगबली (हनुमान) मूर्ती साकारण्यात आली असून या मूर्तीचे अनावरण लवकरच राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शंकर चौगुले यांनी दिली.

वडार समाजाचे आराध्य दैवत असलेल्या बजरंगबलीप्रती श्रद्धा व्यक्त करत समाज बांधवांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या भव्य मूर्तीच्या उभारणीसाठी सुमारे दहा वर्षांचा कालावधी लागला असून सुप्रसिद्ध मूर्तिकार शेखर शहाणे यांनी ही आकर्षक व देखणी मूर्ती साकारली आहे.

हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला या मूर्तीवर दुग्धाभिषेक करण्यात आला असून जयंतीदिवशी महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच विविध धार्मिक कार्यक्रम, समाज मेळावे आणि जनजागृती उपक्रम राबवून वडार समाजात एकजूट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे चौगुले यांनी स्पष्ट केले.

या भव्य मूर्तीचे अनावरण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, तसेच शहरातील सर्व आमदार, अधिकारी व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बजरंगबलीच्या प्रेरणेने समाजाला संघटित करून बळकटी देण्याचा संकल्प या माध्यमातून पूर्ण करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.

या उपक्रमासाठी खाण संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण विटकर, समाजातील पाटील बाबुराव निंबाळकर, विष्णू मुधोळकर, अरुण चौगुले, राजू चौगुले, शंकर बा. चौगुले, बालाजी निंबाळकर, अबू चौगुले, दिलीप भांडेकर, नागनाथ निंबाळकर, लंहू बंदपट्टे, रवी शिंदे, अनिल चौगुले यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचे योगदान लाभले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages