जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्यावरून संताप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 2, 2026

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्यावरून संताप

 जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्यावरून संताप

गुन्हा दाखल करण्याची मागणी



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्या संदर्भात कथित चुकीचे व ऐतिहासिकदृष्ट्या दिशाभूल करणारे वक्तव्य केल्याच्या आरोपावरून जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.

मराठा आंदोलक तथा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राम भैय्या जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित वक्तव्याचा व्हिडिओ पुरावा पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांना सादर करण्यात आला आहे. आचार्य नयन पद्मसागर यांनी आपल्या भाषणात छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूविषयी व महाराणी ताराराणी यांच्या इतिहासाविषयी चुकीची माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

विशेषतः “ताराबाई या जैन राणी होत्या” तसेच संभाजी महाराजांबाबत अमानुष अत्याचारांच्या संदर्भात चुकीचे वर्णन केल्याचे सांगत या वक्तव्यामुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.

यावेळी आंदोलकांनी स्पष्ट केले की, महाराणी ताराराणी या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या असून त्या छत्रपती राजाराम महाराजांच्या धर्मपत्नी होत्या. तसेच धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले असून त्यांच्या शौर्याचा अवमान सहन केला जाणार नाही, अशी भूमिका व्यक्त करण्यात आली.

“अशा प्रकारे खोटा इतिहास पसरवणाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा मराठा समाज व शिव-शंभू भक्त रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील,” असा इशारा राम भैय्या जाधव यांनी दिला.

या वेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संपर्क प्रमुख छत्रगुण माने, किरण शिरसागर, सागर गायकवाड, अक्षय माळोदकर, शुभम खटमोडे यांच्यासह अनेक शिवभक्त उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages