राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा लाभ द्या- किरण भांगे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 2, 2026

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा लाभ द्या- किरण भांगे

 राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा लाभ द्या- किरण भांगे




अकलूज (कटूसत्य वृत्त):- केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषा कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या मृत्यू पश्चात वारसांना एक रकमी 20,000/- रुपये अर्थसहाय्य पुरवले जाते.परंतु आर्थिक वर्ष 2023 पासून मार्च 2026 पर्यंत सदर योजनेसाठी निधी केंद्राकडून उपलब्ध झाला नाही असे किरण भांगे यांनी सांगितले.
पुढे बोलताना भांगे म्हणाले तहसीलदार कार्यालय यांचेकडे चौकशी केली असता ग्रँड उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. माळशिरस तालुक्यातील एकूण 15 अर्जदारांची मंजूर प्रकरणे निधीविना प्रलंबित आहेत.तरी सदर योजनेसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची क्रांतीमित्र सामाजिक संस्थेचे अध्यक्ष  किरण भांगे यांनी लक्ष्मन कसेकर महसूल जिल्हाधिकारी,सोलापूर यांना भेटून निवेदनाद्वारे मागणी केली आहे. अन्यथा आगामी काळात 'भीक मांगो आंदोलना'चा इशाराही देण्यात आला आहे.
एकीकडे सरकार लाडक्या बहिणीसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करत आहे परंतु विधवा भगिनींसाठी शासनाकडे निधी नाही का ? असा सवाल  किरण भांगे यांनी उपस्थित केला आहे. यावेळी केशव लोखंडे, महेश बिस्किटे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages