वाशिंबेतील भैरवनाथ यात्रा उत्सव प्रारंभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 2, 2026

वाशिंबेतील भैरवनाथ यात्रा उत्सव प्रारंभ

 वाशिंबेतील भैरवनाथ यात्रा उत्सव प्रारंभ




वाशिंबे (कटूसत्य वृत्त):- करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील जागृत देवस्थान म्हणून वाशिंबे येथे भीमा नदी काठावर वसलेले प्राचीन भैरवनाथ मंदिर आहे. यात्रा उत्सवाच्या धार्मिक विधी कार्यक्रमास सुरुवात झाली. तीन दिवसीय कालावधीत उत्सव पार पडणार आहे. दि.२ एप्रिल रोजी रात्री बारा पासून दंडवत, अभिषेक, हरिभजन,हनुमान जन्मोत्सव जागर, भैरवनाथ मंदिर येथे रात्री भाविकांची भक्त मानाच्या कावडीची गावातील चौकात सवाद्य मिरवणूक, भैरवनाथ महाराज व जोगेश्वरी आईसाहेब विवाह कार्यक्रम व दि.३ एप्रिल रोजी सकाळपासून देवाचा घोड्यांवरील छबिना पालखी पारंपरिक सवाद्य, ढोल,सनई सह भव्य सुंदर मिरवणूक सोहळा, दुपारी वाजता महाआरती होऊन यात्रा उत्सव संपन्न होत आहे. दु.४ ते ७ यावेमध्ये भैरवनाथ मंदिर परिसरात महाराष्ट्र चॅम्पियन नामवंत मल्ल यांचा भव्य कुस्ती आखाडाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन भैरवनाथ मंदिर ट्रस्ट, बलुतेदार मंडळ समस्त ग्रामस्थ यांच्यावतीने केले आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages