राज्यस्तरीय टॅलेंट सर्च परीक्षेत अकोले (खुर्द)च्या विद्यार्थ्यांची झळाळती कामगिरीअमरसिंह तळेकर राज्यात अकरावा; सोलापूर केंद्रात प्रथम क्रमांक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 1, 2026

राज्यस्तरीय टॅलेंट सर्च परीक्षेत अकोले (खुर्द)च्या विद्यार्थ्यांची झळाळती कामगिरीअमरसिंह तळेकर राज्यात अकरावा; सोलापूर केंद्रात प्रथम क्रमांक

 राज्यस्तरीय टॅलेंट सर्च परीक्षेत अकोले (खुर्द)च्या विद्यार्थ्यांची झळाळती कामगिरीअमरसिंह तळेकर राज्यात अकरावा; सोलापूर केंद्रात प्रथम क्रमांक




टेंभुर्णी(कटूसत्य वृत्त):- अकोले (खुर्द), ता. माढा (वार्ताहर) – महाराष्ट्र टॅलेंट सर्च (MTS) या राज्यस्तरीय परीक्षेत अकोले (खुर्द) येथील मा. बबनरावजी शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत राज्यभरात आपली ठळक छाप पाडली आहे. विशेष म्हणजे चि. अमरसिंह चंद्रकांत तळेकर याने राज्यात अकरावा क्रमांक मिळवत सोलापूर केंद्रात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.
या परीक्षेत विद्यालयातील इतर विद्यार्थ्यांनीही उत्कृष्ट यश मिळवले आहे. कु. वेदिका मनोज देशमुख हिने राज्यात सतरावा क्रमांक मिळवत सोलापूर केंद्रात तृतीय स्थान पटकावले. तसेच चि. संग्राम बाळासाहेब कदम याने राज्यात सोळावा व सोलापूर केंद्रात चौथा क्रमांक मिळवला. याशिवाय, यशवंत प्राथमिक विद्यामंदिरच्या प्राथमिक विभागातील चि. शिवांश अतुल डोके याने इयत्ता चौथीत राज्यात तेरावा व सोलापूर केंद्रात द्वितीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.
दि. २५ जानेवारी २०२६ रोजी जळगाव येथून घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, या यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री. धनुसिंग रजपूत यांचे विशेष कौतुक होत आहे.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. संजयमामा शिंदे, सचिव तथा प्राचार्य मा. राजेंद्र ठोंबरे, प्राचार्या सौ. मधुरा सुरवसे, तसेच प्राथमिक विभागाच्या नेवसे मॅडम आणि सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages