ज्येष्ठांनी समाजाला दिशा दाखवावी: कुंभार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 1, 2026

ज्येष्ठांनी समाजाला दिशा दाखवावी: कुंभार

 ज्येष्ठांनी समाजाला दिशा दाखवावी: कुंभार



ज्येष्ठ नागरिकांनी समाजसेवक म्हणून कार्य करावे.आपल्या अनुभवाचा उपयोग समाजाला योग्य दिशा दाखवणारे असावे असे प्रतिपादन फेस कॉम पुणेचे अध्यक्ष  हनुमंत कुंभार यांनी केले.
शेळगी येथील समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने समाजातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी कुंभार बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिद्धया स्वामी हिरेमठ होते . वीरशैव लिंगायत समाज सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत रमणशेट्टी यांची निवड झाल्याबद्दल, सुरेश हत्ती यांना लिंगायत समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल, वीरशैव लिंगायत समाजाच्या शहर अध्यक्षपदी शिवानंद धुत्तरगी यांची निवड झाल्याबद्दल,मल्लिनाथ शहाबादे, सुरेश चिक्कळी व आनंद करवंदे यांची सोलापूर जनता सहकारी बँकेवर संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल तसेच सर्पमित्र  संतोष बगले आदी मान्यवरांचे सत्कार करण्यात आला तसेच संघातील सदस्यांचे वाढदिवस संघाकडून साजरा करण्यात आला.यावेळी संघाचे अध्यक्ष  शिवलिंगप्पा शहाबादे, सचिव सुनील पुजारी, सहसचिव अंबादास बिराजदार, कोषाध्यक्ष शरणाप्पा यारगले,संचालक विश्वनाथ कल्याणशेट्टी. संचालक काशिनाथ मेलगिरी, संचालक विजयराव काटोलकर, संचालिका  कस्तुरी अक्कलकोटे तसेच कार्यकारी मंडळ व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक खानापुरे यांनी केले तर संघाचे सहसचिव अंबादास बिराजदार यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages