१३५ व्या भीमजयंतीनिमित्त कळंब आगारात महिला नेतृत्वाला मान — जयंती उत्सवाची धुरा महिला कर्मचाऱ्यांच्या हाती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 1, 2026

१३५ व्या भीमजयंतीनिमित्त कळंब आगारात महिला नेतृत्वाला मान — जयंती उत्सवाची धुरा महिला कर्मचाऱ्यांच्या हाती

 १३५ व्या भीमजयंतीनिमित्त कळंब आगारात महिला नेतृत्वाला मान — जयंती उत्सवाची धुरा महिला कर्मचाऱ्यांच्या हाती




कळंब (कटूसत्य वृत्त):- भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती उत्सवाच्या नियोजनासाठी कळंब आगारात उत्साहपूर्ण बैठक पार पडली असून, यंदाच्या जयंती उत्सवाची धुरा महिला कर्मचाऱ्यांच्या हाती सोपविण्यात आल्याने आगारात विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दि. ३० मार्च २०२६ रोजी दत्त मंदिर, रा. प. कळंब आगार येथे आयोजित बैठकीत आगारातील महिला व पुरुष कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. बैठकीत जयंती उत्सवाचे नियोजन, जबाबदाऱ्या आणि विविध समित्यांची रचना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाची प्रस्तावना रविकांत शिंदे यांनी मांडली. त्यानंतर सर्वानुमते जयंती उत्सव समितीची निवड करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी सौ. राजकन्या गवळी (निंबाळकर) यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी श्रीमती वंदना पालके, सचिवपदी सौ. संध्या सोनटक्के, कोषाध्यक्षपदी सौ. सरोजा औसेकर व सौ. निवेदिता रणदिवे, तर प्रसिद्धी प्रमुखपदी सौ. प्रियंका शिंदे व सौ. अनुराधा भोसले यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली.
महिला कर्मचाऱ्यांना नेतृत्वाची संधी देत जयंती उत्सवाची सूत्रे त्यांच्या हाती देण्यात आल्याने आगारातील कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. आगामी भीमजयंती उत्सव अधिक उत्साहात, शिस्तबद्ध आणि सामाजिक संदेश देणारा व्हावा, असा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
यावेळी प्रकाश पटेकर, नितीन गायकवाड, प्रशांत गायकवाड, अंकुश गायकवाड, संघरक्षित गायकवाड, बिभीषण क्षीरसागर, विलास थोरात, अशोक रणदिवे, विश्वनाथ गव्हाळे, आर. वाय. नकाते, एस. एस. कानडे, एस. आर. जाधव, सुनील जगताप, सुबोध रणदिवे, श्याम बनसोडे, एस. बी. पठाण, डी. सी. सरवदे आदी कर्मचारी उपस्थित होते.
 महिला नेतृत्वामुळे यंदाची भीमजयंती अधिक वेगळ्या स्वरूपात साजरी होणार असल्याची चर्चा आगार परिसरात रंगली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages