उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लहान मुलांसाठी मोफत हृदय तपासणी, शस्त्रक्रिया शिबिर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लहान मुलांसाठी रविवार दिनांक 12 एप्रिल रोजी सोलापूर जिल्हा सामान्य रुग्णालयात सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत 2 डी इको मशीन द्वारे मोफत हृदय तपासणी, शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हृदयात छिद्र असलेल्या लहान मुलांसाठी ही शिबिर उपयोगी ठरणार आहे अशी माहिती, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गेली अनेक वर्षे विविध आरोग्य शिबिराचे आयोजन शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मार्फत केले जात असून राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 62 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोलापूर जिल्ह्यामध्ये रविवारी, 12 एप्रिल रोजी एका विशेष आरोग्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आजपर्यंत अशा शिबिरातून 10 हजार पेक्षा जास्त बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील लहान मुलांसाठी मोफत 2डी इको (2D Echo) तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले असून, गरजू रुग्णांना याचा लाभ घेण्याचे आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले आहे.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, ज्युपिटर हॉस्पिटल (ठाणे), आरोग्यदूत फाऊंडेशन आणि शिवसेना सोलापूर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडणार आहे. या शिबिरासाठी प्रमुख तज्ज्ञ डॉक्टर डॉ. आशुतोष सिंग आणि डॉ. पुजा सिन्हा उपस्थित राहणार आहेत. हृदयरोग असलेल्या बालकांसाठी ही एक सुवर्णसंधी असून जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, हे मोफत आरोग्य शिबिर सोलापूर येथे सिव्हिल हॉस्पिटल येथे सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत असणार आहे. या 2डी इको शिबिरामध्ये ज्या बालकांसाठी पुढे शस्त्रक्रिया करायच्या आहेत, त्यांची मोफत शस्त्रक्रिया जुपिटर हॉस्पिटल, ठाणे या ठिकाणी मोफत होतील. आरोग्य शिबिरासाठी सिव्हिल सर्जन डॉ. वर्षा डोईफोडे या सहकार्य करत आहेत.
या पत्रकार परिषदेस शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कार्याध्यक्ष रामहरी राऊत, एकनाथ स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे प्राचार्य बापूसाहेब अडसूळ, मनिष काळजे, सुरज जम्मा आदी उपस्थित होते.
जिल्हा सामान्य रुग्णालयात
2डी इको मशीन उपलब्ध होणार
सोलापुरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात 2डी इको मशीन
नाही. सांगलीतही अशीच परिस्थिती आहे. यामुळे आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. येणाऱ्या काही दिवसातच या दोन्ही ठिकाणी ही मशीन उपलब्ध होणार आहे त्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे, असे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले.
.jpg)
No comments:
Post a Comment