न्यास हे धार्मिक क्षेत्रातील उत्कृष्ट व्यवस्थापन- खा. ज्योतीताई वाघमारे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 9, 2026

न्यास हे धार्मिक क्षेत्रातील उत्कृष्ट व्यवस्थापन- खा. ज्योतीताई वाघमारे

 न्यास हे धार्मिक क्षेत्रातील उत्कृष्ट व्यवस्थापन- खा. ज्योतीताई वाघमारे

अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली तीर्थ क्षेत्र अक्कलकोटच्या विकासाला चालना मिळाली असून, श्री स्वामी समर्थ महाराजांची महती सातासमुद्रापार अन्नछत्र मंडळामुळे झाली आहे. न्यास हे धार्मिक क्षेत्रातील उत्कृष्ट व्यवस्थापन असल्याचे मनोगत नूतन राज्यसभा सदस्या खासदार ज्योतीताई वाघमारे यांनी व्यक्त केल्या.


त्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे आले असता न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी राज्याचे माजी गृहराज्य मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्य न्यासाच्या वतीने अभीष्टचिंतन करण्यात आले. 

यावेळी सो.म.पा. नगरसेवक अमोलबापू शिंदे, सो. म.पा. नगरसेवक प्रियदर्शन साठे, महेश साठे, अमर पाटील, युवसेना उपजिल्हा प्रमुख- दिपक पाटील, भीमा वाघमारे, गणेश तुपडॊळे, लक्ष्मण वाघमारे, गणेश जंगडेकर, भैया माने, सागर नवत्रे, सिद्धार्थ गायकवाड, विश्वनाथ हडलगी, सुनिल कटारे, प्रा. सुर्यकांत कडबगावकर, यांच्या सह न्यासाचे उपाध्यक्ष  अभय खोबरे ,सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, अतिश पवार, निखील पाटील, प्रवीण घाडगे, बाळासाहेब पोळ, फहीम पिरजादे, आकाश गडकरी, गोविंद शिंदे, किरण साठे, विनायक भोसले, ओंकार देशमुख, एस.के.स्वामी, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, राजू पवार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, विशाल घाटगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages