आ. सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नांना यश;
5 ग्रामपंचायतींना 1 कोटी 15 लाखांचा निधी मंजूर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील ग्रामविकासाला चालना देण्यासाठी आमदार सुभाष देशमुख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पाच ग्रामपंचायतींसाठी तब्बल 1 कोटी 15 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतून देण्यात आला आहे.
या निधीतून संबंधित ग्रामपंचायतींमध्ये पायाभूत सुविधा, ग्रामपंचायत इमारती व इतर विकासकामांना गती मिळणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना थेट लाभ होणार असल्याचे सांगितले जात आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींना
एकूण 1 कोटी 15 लाख रुपयांचा हा निधी मंजूर झाल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे. आमदार देशमुख यांनी यासाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
दरम्यान, या निधी मंजुरीबद्दल स्थानिक नागरिक व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आमदार देशमुख यांचे आभार मानले असून, महायुती सरकारचेही कौतुक केले आहे.
चौकट
मंजूर निधीचा तपशील पुढीलप्रमाणे
तिर्हे ग्रामपंचायत – 25 लाख रुपये
बेलाटी ग्रामपंचायत – 25 लाख रुपये
बंकलगी ग्रामपंचायत – 25 लाख रुपये
अकोले मंद्रूप ग्रामपंचायत – 20 लाख रुपये
विंचूर ग्रामपंचायत – 20 लाख रुपये
.png)
No comments:
Post a Comment