आसरा पूल , पोषम्मा मंदिर परिसरातील अतिक्रमण काढले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 27, 2026

आसरा पूल , पोषम्मा मंदिर परिसरातील अतिक्रमण काढले

 आसरा पूल , पोषम्मा मंदिर परिसरातील अतिक्रमण काढले




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरातील आसरा रेल्वे पूल आणि शनिवार पेठेतील पोषम्मा मंदिर परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले. महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने आज ही मोहीम पोलीस बंदोबस्तात राबविण्यात आली.

अतिक्रमित एक खोके जागेवर निष्काशीत करण्यात आले तर दोन खोके काढण्यात आले.

रस्त्यावर अडथळा ठरणारे तसेच सार्वजनिक ठिकाणी करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्याची मोहीम महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने नियमितपणे सुरू आहे. दरम्यान, आज आसरा रेल्वे पूल परिसरातील जामगुंडी मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्यात आले. रस्त्यावरील एक खोके जागेवरच जेसीबीच्या साह्याने निष्काशीत करण्यात आले. दोन खोके हटविण्यात आली.

त्यानंतर शनिवार पेठ येथील पोषम्मा मंदिर आणि लक्ष्मी मंदिर यामधील जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण काढण्यात आले. यापूर्वी 13 एप्रिल 2026 रोजी येथील अतिक्रमण काढण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा आज मोहीम राबविण्यात आली, अशी माहिती महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी दिली. सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्याच्या कडेला अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्याची मोहीम नियमितपणे महापालिका प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करू नये, असे आवाहन अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages