मोहोळ तालुका जनगणनेसाठी सज्ज; ५११ कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 27, 2026

मोहोळ तालुका जनगणनेसाठी सज्ज; ५११ कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात

 मोहोळ तालुका जनगणनेसाठी सज्ज; ५११ कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात




मोहोळ (कटूसत्य वृत्त):- आगामी जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय तयारीला वेग आला असून, तहसीलदार सचिन मुळीक यांच्या उपस्थितीत प्रगणक व पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. मोहोळ येथील देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालयात ता २३, २४ व २५ एप्रिल दरम्यान प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्याला प्रारंभ झाला असल्याची माहिती प्रशासना कडुन देण्यात आली.


केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार जनगणनेची प्राथमिक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागासाठी एकूण ३९८ प्रगणक, ६७ पर्यवेक्षक व ४६ राखीव कर्मचारी अशा एकूण ५११ जणांची टीम तयार करण्यात आली आहे. या सर्वांना तीन टप्प्यांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी २०० प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात आली आहे.

तहसीलदार सचिन मुळीक यांनी दिलेल्या माहिती नुसार, प्रशिक्षणाचे तीन टप्पे नियोजित असून, पहिला टप्पा २३ ते २५ एप्रिल, दुसरा टप्पा २७ ते २९ एप्रिल आणि अंतिम टप्पा ४ ते ६ मे दरम्यान पार पडणार आहे. या माध्यमातून सर्व ५११ कर्मचाऱ्यांना जनगणनेचे सविस्तर प्रशिक्षण दिले जाईल.

जनगणना प्रक्रिये विषयी नागरिकांना माहिती देताना त्यांनी सांगितले की, १ मे ते १५ मे या कालावधीत नागरिकां मार्फत स्वगणनेचा टप्पा पार पडेल. त्यानंतर १६ मे ते १४ जून दरम्यान प्रगणक घरोघरी भेट देऊन घरांची व इमारतींची नोंदणी करतील. या काळात नागरिकांनी अचूक व संपूर्ण माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार मुळीक यांनी केले.

देशाच्या विकासा साठी व भविष्यातील नियोजना साठी जनगणनेतील माहिती अत्यंत महत्त्वाची ठरते. पायाभूत सुविधा, विविध योजना व विकास कामांसाठी ही माहिती आधारभूत असल्याने नागरिकांनी जबाबदारीने सहभाग नोंदवावा असे अवाहन प्रशासनाने केले.

या प्रशिक्षण शिबिरास नायब तहसीलदार संदेश भोसले, महसूल सहायक राहुल शिंदे, तांत्रिक सहायक सोमनाथ सोनवणे,अल्ताफ कोरबू तसेच प्रशिक्षण अधिकारी महेश कोटीवाले, महेश गोडगे, हजरत शेख, लक्ष्मण भोसले, शंकर माने, गणेश वाघमारे, रियाज मुजावर आणि जावेद आतार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages