सोलापूरात भाजप सहकार सेलची नवी कार्यकारिणी जाहीर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 10, 2026

सोलापूरात भाजप सहकार सेलची नवी कार्यकारिणी जाहीर

 सोलापूरात भाजप सहकार सेलची नवी कार्यकारिणी जाहीर

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भारतीय जनता पार्टी, सोलापूर शहर जिल्हा यांच्या सहकार सेल (प्रकोष्ठ)ची नवीन कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली. सहकार सेलचे संयोजक गणेश चौटे यांच्या वतीने महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.

यावेळी शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे तसेच स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते यांची प्रमुख उपस्थिती होती.

नवीन कार्यकारिणीत सहसंयोजक म्हणून किशोर नारायणराव बसूदे आणि प्रशांत रामकृष्ण हबीब यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच सदस्य म्हणून प्रमोद सुनील पवार, कृष्णाथ खंडूसा दलमंजन, राकेश शंकर काशिगाव, अभिषेक श्रीनिवास पवार, सतीश मोतीलाल बिद्री, राहुल मोतीलाल शालगर, बसवराज शिवपुत्र इंडे, शिवानंद पंचय्या पुराणिक, श्रीनिवास मधुकर पेठकर, राजू गिरूसा पवार, चंद्रकांत बुडप्पा मिस्कीन आणि अर्जुन हणमंसा पवार यांचा समावेश करण्यात आला आहे.

या सर्व पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नव्या कार्यकारिणीचे अभिनंदन करत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच सहकार क्षेत्रात प्रभावी काम करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमादरम्यान सहकार सेलच्या वतीने महापौर विनायक कोंड्याल यांचा सत्कारही करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages