सिंहगड कॉलेजच्या विद्यार्थिनीची पोलीस भरतीत दमदार कामगिरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 10, 2026

सिंहगड कॉलेजच्या विद्यार्थिनीची पोलीस भरतीत दमदार कामगिरी

 सिंहगड कॉलेजच्या विद्यार्थिनीची पोलीस भरतीत दमदार कामगिरी


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग केगाव, सोलापूर येथील विद्यार्थिनी गौरी अनिल वाघमारे हिने पोलीस भरतीत उल्लेखनीय यश संपादन करत सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीसमध्ये निवड मिळवली आहे. तिच्या या यशामुळे परिसरात तिचे कौतुक होत आहे.

मोहोळ तालुक्यातील कोरवली येथील रहिवासी असलेल्या गौरीचे वय 20 वर्षे असून ती शेतकरी कुटुंबातील आहे. वडील शेती करतात तर आई गृहिणी आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही तिने शिक्षणासोबत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली.
गौरीने प्राथमिक शिक्षण गावात पूर्ण केले असून 12 वी नंतर ती सध्या सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर येथे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे.

पोलीस भरती प्रक्रियेत तिला एकूण 118 गुण मिळाले असून ती SC प्रवर्गातून प्रथम क्रमांकाने निवडली गेली आहे. तिची निवड सोलापूर ग्रामीण पोलीस दलात झाली आहे. मेहनत आणि चिकाटीचा प्रवास
प्रथम वर्षात प्रवेश घेतल्यानंतरच गौरीने पोलीस भरतीचे स्वप्न पाहिले. सुरुवातीला तिला रनिंग आणि फिजिकल चाचण्यांमध्ये अडचणी आल्या. मात्र, कॉलेजच्या मैदानावर दररोज नियमित सराव करत तिने स्वतःमध्ये सातत्याने सुधारणा केली. फिजिकल टेस्टमध्ये 800 मीटर, 100 मीटर धावणे आणि गोळाफेक यासाठी तिने विशेष मेहनत घेतली. पहिल्या प्रयत्नात काही अडचणी आल्या, मात्र दुसऱ्या प्रयत्नात तिने उत्तम कामगिरी करत यश मिळवले.

कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांच्या आणि विभागीय उपआयुक्त संजय माने यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.‌ यावेळेस प्राचार्य डॉ शंकर नवले, प्रबंधक डॉ. डी. आय नवले यांची उपस्थिती होती. अपयश आले तरी खचू नका. सातत्य आणि मेहनत ठेवल्यास यश नक्की मिळते. प्रत्येक वेळी नव्या उत्साहाने तयारी करा,” असे ती म्हणाली.


✓ सिंहगडचा मोठा आधार


या यशामागे कॉलेज प्रशासनाचा मोठा वाटा असल्याचे गौरीने सांगितले. कॅम्पस डायरेक्टर आणि प्राध्यापकांनी तिला वेळोवेळी मार्गदर्शन केले. तसेच विभागप्रमुख (HOD) आणि प्राध्यापकांनी अभ्यास व उपस्थितीबाबत सहकार्य करत तिचा आत्मविश्वास वाढवला.
कॉलेज प्रशासनानेही गौरीच्या यशाबद्दल अभिनंदन करत तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांनी ज्या मैदानावर तिने तयारी केली त्याच मैदानावर गौरीचा विशेष सत्कार केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages