मराठा साम्राज्याचा नकाशा पुन्हा एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 10, 2026

मराठा साम्राज्याचा नकाशा पुन्हा एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करा

 मराठा साम्राज्याचा नकाशा पुन्हा एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करा

 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- NCERT ने इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा हटवण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाला संभाजी ब्रिगेडने तीव्र विरोध करून  पूर्वी जो मूळ नकाशा होता तो कायम ठेवण्याची मागणी भारताचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्याकडे ईमेल द्वारे करण्यात आली आहे. 
मूळ नकाशाला विरोध केल्या नंतर त्यात बदल करून काही तत्कालीन राजपूत राज्ये वगळण्यात आली. त्यास ही विरोध करण्यात आल्या नंतर संपूर्ण नकाशाच काढून टाकण्यात आला. 

मराठा साम्राज्याचा इतिहास म्हणजे केवळ भूतकाळ नाही, तर स्वाभिमान, पराक्रम आणि राष्ट्ररक्षणाची जाज्वल्य परंपरा आहे.  हा भारतीय इतिहासातील एक सुवर्ण अध्याय आहे.
 छत्रपती शाहू महाराजांच्या कारकीर्दीत मराठे दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचले होते. पुढे जाऊन त्याचा विस्तार अगदी अटक पर्यंत झाला. 
राजस्थानातील मराठ्यांच्या मोहिमा याचे जिवंत उदाहरण आहेत —
• रामपुरा मोहिम (1734–35) – मराठ्यांचा विजय
• बुंदी मोहिम (1730 च्या दशकात) – हस्तक्षेप करून गादी स्थापन
• कक्कोरचे युद्ध (1759) – जयपूरवर विजय
• पाटनचे युद्ध (1790) – शिंदेंचा निर्णायक विजय
• मेर्टा युद्ध (1790) – जोधपूरचा पराभव
• मालपुरा युद्ध (1800) – मराठ्यांचा प्रभाव प्रस्थापित

या सर्व मोहिमांमधून मराठ्यांचे पराक्रम, वेगवान युद्धनीती आणि उत्तर भारतातील प्रभाव स्पष्ट दिसतो. अनेक राजपूत राज्यांनी मराठ्यांचे वर्चस्व मान्य केले होते
अशा गौरवशाली आणि प्रेरणादायी इतिहासाचे प्रतिनिधित्व करणारे घटक अभ्यासक्रमातून कमी करणे किंवा हटवणे हे दुर्दैवी आहे. इतिहास हा कोणत्याही दबावाखाली बदलला जाऊ नये, तर तो सत्य आणि पुराव्यांच्या आधारे पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे मा. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम जिल्हा कार्याध्यक्ष इशरत नागोरे जिल्हा उपाध्यक्ष फिरोज सय्यद दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष जैनुद्दीन नदाफ असद नागोरे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages