व्हिजन एक्स्पोच्या माध्यमातून महिला उद्योजकांना व्यासपीठ मिळाले - आमदार चित्रा वाघ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, April 25, 2026

व्हिजन एक्स्पोच्या माध्यमातून महिला उद्योजकांना व्यासपीठ मिळाले - आमदार चित्रा वाघ

 व्हिजन एक्स्पोच्या माध्यमातून महिला उद्योजकांना व्यासपीठ मिळाले - आमदार चित्रा वाघ




सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  महाराष्ट्रातून तसेच देशभरातून महिला उद्योजक तयार व्हावेत यासाठीच सहकार भारतीच्या वतीने चांगले व्यासपीठ देण्याचा प्रयत्न या व्हिजन एक्स्पोच्या माध्यमातून होत आहे याचा आनंद आहे असे प्रतिपादन भारतीय जनता पक्ष महिला प्रदेश अध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी केले. सोलापूर जिल्हा सहकार भारतीच्या वतीने 24 ते 26 एप्रिल या तीन दिवसीय व्हिजन एक्स्पोचे नॉर्थ कोट मैदानावर आयोजन करण्यात आले होते त्याचे उद्घाटन वाघ यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल,माजी आमदार दिलीप माने, शहाजी पवार, सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश संघटक शरद जाधव, एक्स्पोच्या स्वागताध्यक्ष सुधा अळ्ळीमोरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सोलापूर संघचालक राजु काटवे आदी मान्यवर उपस्थित होते.
   सोलापूरच्या महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी मी या व्हिजन एक्स्पोला आले. सहकार भारतीच्या माध्यमातून सहकारात पारदर्शकता येत आहे. महिलांमध्ये काम करण्याची धमक आणि जिद्द आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 100 योजना सुरू केल्या तर त्यातील 60 योजना या महिलांसाठी आहेत. महिला उभी राहिली तर घर उभं राहतं आणि घर उभं राहिलं तर समाज आणि राष्ट्र उभा राहतो असेही चित्रा वाघ यांनी आपल्या मनोगतामधून सांगितले.
   प्रारंभी महिला प्रकोष्ठ प्रमुख प्राची धामणगांवकर यांनी प्रास्ताविक केले त्यामध्ये त्यांनी या व्हिजन एक्स्पोच्या माध्यमातून महिलांना कोणत्या सुविधा देण्यात आल्या आणि आयोजनाबाबतची माहिती दिली. त्यानंतर स्वागताध्यक्ष सुधा अळ्ळीमोरे यांनी सांगितले की हा तीन दिवसाचा इव्हेंट नाही तर महिलांना उद्योजक होण्यासाठी भविष्यात नेहमी मार्गदर्शन आणि सहकार्यृ करण्यात येणार आहे. या व्हिजन एक्स्पोच्या माध्यमातून कला स्वाद आणि संस्कृतीचा अनोखा संगम साधण्यात आला आहे. महिलांनी महिलांसाठी आणि महिलांकडून आयोजित करण्यात आलेला हा सहकार भारतीचा व्हिजन एक्स्पो सोलापूरकरांनी मोठ्यासंख्येने सहभागी होवून महिलांना प्रोत्साहन द्यावे असेही स्वागताध्यक्ष सुधा अळ्ळीमोरे यांनी सांगितले.
महिला उद्योजक होण्यासाठीचा इतिहास आणि सोलापूरच्या विकासातील महिला उद्योजकांची माहिती स्वाती अळ्ळीमोरे यांनी आपल्या मनोगतामधून सांगितले.
  हणमंत कोळी यांनी सहकार गीत सादर करून कार्यक्रमाची सुरूवात केली त्यानंतर आमदार चित्रा वाघ यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व्हिजन एक्स्पोचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर चित्रा वाघ यांनी महिलांच्या सर्व स्टॉल्सना भेट देवून महिलांकडून उत्पादित केलेल्या वस्तु आणि पदार्थाची पाहणी केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड.अर्चना कुलकर्णी यांनी केले तर आभार अ‍ॅड. साधना संगवे यांनी व्यक्त केले. शेवटी शिल्पा जिरांकलगी यांनी वंदेमातरम गीत गायन करून उदघाटन समारंभाची सांगता करण्यात आली. या व्हिजन एक्स्पोच्या उदघाटन समारंभासाठी सहकार भारतीचे विभाग प्रमुख संतोष गायकवाड, कार्यकारणी सदस्य सुर्यकांत पाटील, सोलापूर जिल्हा अध्यक्ष किरण करकमकर, महामंत्री यशवंत बुर्‍हाडे,  सुजाता इनामदार,डॉ. जयंत शेळगीकर, प्रशांत बडवे, श्रृती पवार, उत्तरा बरडे, आरती पानगांवकर,कुमुद अंकाराम, सुवर्णा पेठे, चंद्रिका चव्हाण, नगरसेवक सात्विक बडवे आदींसह सहकार भारतीच्या स्वागत समिती सदस्य तसेच मान्यवर मोठ्यासंख्येने उपस्थित होते.


चौकट -
महिलांची गर्दी
सहकार भारतीच्या व्हिजन एक्स्पोला उदघाटनापुर्वीच महिलांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
मोफत स्टॉल्स उपलब्ध केल्याने सहकार भारतीचे चित्रा वाघ यांच्याकडून कौतुक

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages