नातेपुते येथे पेशवा ब्राह्मण संघटनेच्या वतीने परशुराम जयंती साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, April 25, 2026

नातेपुते येथे पेशवा ब्राह्मण संघटनेच्या वतीने परशुराम जयंती साजरी

 नातेपुते येथे पेशवा ब्राह्मण संघटनेच्या वतीने परशुराम जयंती साजरी




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- नातेपुते येथे  पेशवा ब्राह्मण संघटनेचे वतीने परशुराम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य परशुराम आथिर्क विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले तर अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध हदयरोग तज्ञ एम के इनामदार उपस्थित होते.
नातेपुते येथील राज वैभव सांस्कृतिक मंगल कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी मान्यवरांच्या हस्ते  परशुराम यांचा प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले.
तसेच नातेपुते परिसरातील ब्राम्हण समाजातील विविध क्षेत्रात तसेच शैक्षणिक क्षेत्रातील
 उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मुलांचे सत्कार करण्यात आले.
या वेळी बोलताना परशुराम आथिर्क विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी सांगितले की, मी आज या पदावर कार्यरत असताना अनेक विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला आहे. ब्राह्मण समाजातील अनेक दिवसांपासून अडचणी दूर करण्यासाठी शासकीय दरबारात समाजाच्या आथिर्क उन्नतीसाठी आपले प्रयत्न करत आहेत.आपल्याला कोणत्याही प्रकारचा सवलत नाही. शैक्षणिक गुणवत्ता ठेवून आपण नवीन पिढी हुशार व अधिकारी पदावर नियुक्ती होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.ब्राह्मण समाजातील भिक्षुकी करणाऱ्या बांधवांना शासनाच्या वतीने आथिर्क मदत देण्याची मागणी आपण शासनाने केली आसल्याचे मत कॅप्टन आशिष दामले यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी नातेपुते परिसरातील अनेक गावांतून ब्राम्हण समाजातील महिला पुरुष व मुली मुले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा टोमके व प्रवीण बडवे यांनी केले असून आभार पेशवा ब्राह्मण संघटनेचे अध्यक्ष पुष्कर घुगरदरे यांनी आभार मानले. सदर घेण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी पेशवा ब्राह्मण संघटनेचे सर्व सदस्य कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.


चौकटीत : 
मी दरवर्षी या कार्यक्रमात सहभागी होतो  आहे. खरोखर अतिशय सुंदर व समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या समाज बांधवांना एकत्र येऊन सामाजिक व आर्थिक स्थिती कशी सुधारता येईल या बाबतीत आपण सर्वांनी काम करावे. आपल्या या कार्यात माझ्याकडून हवी ती मदत  देण्यासाठी मी तयार आहे.समाजातील मुलांनी व्यवसाय सुरू करून नवीन क्षेत्रात काम करावे.
                                       डॉ.एम. के. इनामदार

फोटो ओळी :
कार्यक्रम प्रसंगी बोलताना परशुराम आथिर्क विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages