उद्योजीका भाग्यश्री आवळे यांचा बार्शी आगारात सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, April 25, 2026

उद्योजीका भाग्यश्री आवळे यांचा बार्शी आगारात सत्कार

 उद्योजीका भाग्यश्री आवळे यांचा बार्शी आगारात सत्कार



बार्शी(कटूसत्य वृत्त):- नवर्‍याने सुरु केलेला व्यावसाय बंद पडू द्यायचा नाही. ही जिद्द मनासी बाळगुन फ्रेंडन्स इव्हेट मॅनेजमेंट यशस्वी रित्या सांभाळणार्‍या आणि हजारो महिलांच्या पुढे आदर्श ठरलेल्या उद्योजिका भाग्यश्री आवाळे यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे बार्शी आगारात यशस्वी आयोजन केल्या बद्दल  बार्शी आगाराचे व्यवस्थापक  संजय भोसले आणि भालशंकर माळी यांच्या हस्ते सत्कर करण्यात आला.
 रोजगाराच्या शोधात असलेल्या दिपक आवळे यांनी धाराशिव येथे फ्रेंडन्स इव्हेट मॅनेजमेंटची मुहर्तमेढ रोवली. मात्र 2009 मध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात वाहक म्हणुन नोकरी लागल्यानंतर पत्नी भाग्यश्री आवळे यांनी घरी बसुन रहाण्यापेक्षा पती दिपक यांनी उभारलेल्या छोट्या व्यावसायाची जबाबदारी खांद्यावर घेवून आणि महिलांना रोजगार निर्मिती करत फे्रंडन्स इव्हेटचे वटवृक्षात रुपांतर केले. आज धाराशिव जिल्हा आणि बार्शी तालुक्यात सर्व प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन, भोजन, डेकोरेशन अशी सर्व कामे यशस्वीरित्या केली जात आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे डेकोरेशन आणि भोजन व्यवस्थापनाची जाबाबदारी बार्शी आगारातील कर्मचार्‍यांनी भाग्यश्री आवाळे यांच्यावर सोपवली होती. ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल बार्शी आगाराचे व्यवस्थापक संजय भोसले यांच्या हस्ते भाग्यश्री आवाळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भोसले म्हणाले, एका एसटी कर्मचार्‍याची पत्नी इव्हेट मॅनेजमेंटसारखा उद्योग यशस्वीपणे चालवते हे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण आहे. त्यामुळे भाग्यश्री आवळे यांचा कार्याचा आदर्श इतिर महिलांनी घेणे गरजेचे आहे. भाग्यश्री आवाळे या स्वत: गाडी चालवत डेकोरेशन आणि भोजनाची व्यवस्था उत्तम पध्दतीने करत असल्याचा अभिमान आहे. यावेळी कार्यशाळा अधिक्षक नाईक, अध्यक्ष फिरोज मुलाणी, आदित्य आडसूळ,दयावंत माळी, कुंडलिक सरवदे, भालशंकर माळी आदीसह बार्शी आगारातील कर्मचाराची मोठ्या संखेने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages