संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीचे माढा मतदारसंघात माजी सभापती विक्रमसिंह शिंदे यांनी केले भक्तीमय वातावरणात स्वागत.
टेंभुर्णी(कटूसत्य वृत्त):- माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ठ असलेल्या माळशिरस तालुक्यातील माळीनगरपासून 3 कि.मी. अंतरावर बोरावके वस्तीनजीक जगद् गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीचे स्वागत माढा विधानसभा मतदारसंघात माढा पंचायत समितीचे माजी सभापती विक्रमसिंह शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.अमृताताई शिंदे यांनी केले.
माळीनगर येथील विसावा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर तुकाराम महाराजांची पालखी बोरगावकडे मुक्कामासाठी मार्गस्थ होत असते. या मार्गावर बोरावके वस्तीनजीक माढा विधानसभा मतदारसंघाची सरहद्द प्रारंभ होते. मागील वीस वर्षापासून याच ठिकाणी मा.आ.बबनदादा शिंदे सपत्नीक या पालखीचे स्वागतासाठी उपस्थित रहात होते. परंतु मा.आ.शिंदे हे उपचारासाठी परदेशी असल्याने जगद् गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीच्या स्वागतासाठी माढा पंचायत समितीचे माजी सभापती विक्रमसिंह शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.अमृताताई शिंदे यांनी उपस्थित राहून पालखी सोहळ्याचे विश्वस्त जालिंदर मोरे महाराज,उमेश मोरे, दिलीप मोरे महाराज, बाळासाहेब मोरे महाराज, निकम महाराज, या मानक-यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून भक्तीमय वातावरणात स्वागत केले.
याप्रसंगी महाळुंग चे नगराध्यक्ष प्रतिनिधी अशोक चव्हाण, नगरसेवक रावसाहेब सावंत,नवगिरे सर, मारूती बापू रेडे,वाफेगाव चे समाधान गाडे,टिल्ला इंगळे,वाघोलीचे सुदर्शन मिसाळ,अंकुशकाका वाघ, लवंगचे राहूल टीक,गटनेते राहूलअप्पा रेडे,गजानन पाटील, मिटलकवाडीचे मोहनअप्पा लोकरे, रणजित बोरावके,जयदीप बोरावके, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे कार्यकारी संचालक एस.एन.डिग्रजे, असि.परचेस ऑफीसर सचिन चौगुले, कामगार युनियन अध्यक्ष अनिल वीर, ॲग्रीओव्हरसिअर पी.आर.राजमाने आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:
Post a Comment