टेंभुर्णी पत्रकार संघाकडून वारकऱ्यांची सेवा; वारकऱ्यांना चहा व अल्पोपहार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 21, 2026

टेंभुर्णी पत्रकार संघाकडून वारकऱ्यांची सेवा; वारकऱ्यांना चहा व अल्पोपहार

टेंभुर्णी पत्रकार संघाकडून वारकऱ्यांची सेवा; वारकऱ्यांना चहा व अल्पोपहार



टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- आषाढी वारीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या वारकऱ्यांची सेवा करण्याचा सेवाभावी उपक्रम टेंभुर्णी शहर-ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने राबविण्यात आला. मंगळवार, दि. २१ रोजी टेंभुर्णी येथील कुर्डुवाडी चौकात वारकऱ्यांना मोफत चहा व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.

या सेवाभावी उपक्रमाचा शुभारंभ ज्येष्ठ पत्रकार संतोष पाटील, टेंभुर्णीचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अनिल जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. वारकऱ्यांनीही पत्रकार संघाच्या या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत आयोजकांचे आभार मानले.
यावेळी टेंभुर्णी प्रेस क्लबचे सतीश चांदगुडे, विष्णू बिचकुले, सोपान ढगे,गणेश पोळ,गणेश चौगुले, संतोष वाघमारे,महावीर वजाळे, सुरज देशमुख,श्रीकांत मासुळे,आदी पत्रकार उपस्थित होते.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शहर-ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय भोसले, उपाध्यक्ष राजेंद्र दडस, तसेच नाथा सावंत, हरिश्चंद्र गाडेकर, मुकुंद रामदासी, सिद्धेश्वर शिंदे, सज्जन शिंदे, दत्तात्रय सुरवसे, गणेश स्वामी, सुहास कांबळे, सोमनाथ निर्धार, विनायक जोशी, प्रदीप पाटील, विकास श्रीखंडे, भारत जगताप, दीपक देशपांडे, आसिफ काझी, गणेश भोसले यांच्यासह सर्व पत्रकारांनी परिश्रम घेतले.
आषाढी वारीच्या पवित्र वातावरणात वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी लाभल्याचे समाधान पत्रकारांनी व्यक्त केले. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत पत्रकार संघाने राबविलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडूनही कौतुक करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages